भुसावळातील हद्दपार मुकेश भालेरावसह पाच जणांचा कसून शोध

By admin | Published: June 30, 2017 12:52 PM2017-06-30T12:52:16+5:302017-06-30T12:52:16+5:30

भुसावळात गोळीबार करून थरार उडवून देणा:या हद्दपार तथा कुविख्यात मुकेश भालेरावसह अन्य पाच आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक जंग-जंग पछाडत आहेत

Bhushan's expatriate Mukesh Bhalerao and five men were thoroughly searched | भुसावळातील हद्दपार मुकेश भालेरावसह पाच जणांचा कसून शोध

भुसावळातील हद्दपार मुकेश भालेरावसह पाच जणांचा कसून शोध

Next

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.30 - भुसावळात गोळीबार करून थरार उडवून देणा:या हद्दपार तथा कुविख्यात मुकेश भालेरावसह अन्य पाच आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक जंग-जंग पछाडत आहेत तर अटकेतील पाच आरोपींकडून पसार झालेल्या आरोपींची माहिती काढण्याचे कसोशीचे प्रयत्न शहर पोलिसांचे सुरू आहेत़
रविवारी रात्री भुसावळच्या पवन नगरात निखील झांबरे या तरुणावर गोळी झाडून जखमी केल्यानंतर भारत नगरात आरोपींनी हवेत गावठी बंदुकीतून तीन फैरी झाडत रहिवासी वस्तीत दहशत निर्माण केली होती़ घटनास्थळातील प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार तीन दुचाकीवरून नऊ ते दहा आरोपी आले होत़े त्यानंतर पोलिसांनी शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत खब:यांच्या माध्यमातून आरोपींची नावे निष्पन्न केली होती तर आतार्पयत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आह़े 
पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
गोळीबार प्रकरणी श्यामल शशिकांत सपकाळे (कोळी) व सुशील संजय इंगळे (रा.पिंप्राळा, जळगाव) यांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांना 1 जुलैर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलीस पूत्र रणवीर उर्फ राणू बॉक्सर विजय इंगळे (21, शांतीनगर, भुसावळ), करण किशन इंगळे (21, राहुल नगर, भुसावळ) व दीपक श्रावण लोखंडे (22, आरपीएफ बॅरेकजवळ, भुसावळ) यांना गुरुवारी रावेर तालुक्यातील खिरोदा येथील शेतशिवारातून अटक करण्यात आल्यानंतर शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आह़े अटकेतील राणू बॉक्सर हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील विजय इंगळे या कर्मचा:याचा मुलगा आह़े
हद्दपार मुकेश भालेरावसह पाच जणांचा कसून शोध
भुसावळच्या रहिवासी वस्तीत गोळीबार करणारा कुख्यात हद्दपार आरोपी मुकेश भालेराव असल्याची माहिती पुढे आली असून त्याच्यासह अन्य चार आरोपींचा पोलिसांच्या पथकाकडून कसून शोध सुरू आह़े पोलिसांचे पथक औरंगाबादसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये गेल्याची माहिती आह़े

Web Title: Bhushan's expatriate Mukesh Bhalerao and five men were thoroughly searched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.