इंधन दरवाढ व महागाई विरोधात मुक्ताईनगरला सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:42+5:302021-07-16T04:12:42+5:30

मुक्ताईनगर : केंद्रातील मोदी सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाई खूपच वाढली असून लोकांचे जगणे कठीण झाले आहे. ...

Bicycle rally in Muktainagar against fuel price hike and inflation | इंधन दरवाढ व महागाई विरोधात मुक्ताईनगरला सायकल रॅली

इंधन दरवाढ व महागाई विरोधात मुक्ताईनगरला सायकल रॅली

Next

मुक्ताईनगर : केंद्रातील मोदी सरकारच्या मागील सात वर्षांच्या काळात महागाई खूपच वाढली असून लोकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहेत. अलीकडच्या काळात पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस घेणे सर्वसामान्य माणसाला परवडेनासे झाले आहे. याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे परिवर्तन चौक ते तहसीलपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर कमी असताना मोदी सरकारने इंधन व गॅस यांचे दर आवाक्याबाहेर केले आहे. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही दुसरीकडे वाढणारी महागाई अशा अडचणीत देशातील जनता भरकटली जात आहे, धनगर मुक्ताईनगर येथील तहसीलदारांना काँग्रेसतर्फे निवेदन देऊन मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

150721\img-20210714-wa0114.jpg

मुक्ताईनगर तहसील कार्यालय समोर सायकल रॅली काढत इंधन व महागाई निषेधार्थ आंदोलन प्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर जगदीश पाटील बी डी गवई व इतर (छायाचित्र विनायक वाडेकर मुक्ताईनगर)

Web Title: Bicycle rally in Muktainagar against fuel price hike and inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.