दुचाकी चोरटय़ांचा शहरात उच्छाद
By admin | Published: March 17, 2017 12:31 AM2017-03-17T00:31:42+5:302017-03-17T00:31:42+5:30
जळगाव : शहरात दुचाकी चोरटय़ांनी उच्छाद मांडला असून दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत.
जळगाव : शहरात दुचाकी चोरटय़ांनी उच्छाद मांडला असून दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवडय़ात दोन पोलिसांच्या दुचाकी चोरीस गेल्या होत्या. अशा एकूण आठवडाभरात पाच दुचाकी चोरी गेल्या आहेत.
गांधी मार्केट व भिलपुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरटय़ांनी दोन दुचाकी चोरुन नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असून याबाबत शहर व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकापाठोपाठ दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे.
धीरज यशवंत ठाकरे (वय 26 रा. वाल्मीक नगर) हा गांधी मार्केट परिसरातील विजय कलेक्शन येथे कामाला असून तो 30 जानेवारी रोजी नेहमी प्रमाणे सकाळी 10.30 वाजता दुचाकीने (क्र.एम.एच.19. बीएल. 8426) दुकानावर आला. सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास दुकानातील सुरक्षा रक्षकाने धीरजला दुचाकी चोरी झाल्याची माहिती दिली. त्याने गांधी मार्केट परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतु, मिळाली नाही. गुरुवारी धीरज ठाकरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस:या घटनेत भिलपुरा परिसरात राहणारे गुलाम मोहम्मद रजवी (वय 40) यांची दुचाकी (क्र.एम.एच.19.सी.डी.9211) 14 मार्च रोजी सकाळी भिलपुरा परिसरातील मशिदीजवळून चोरी झाली आहे. त्यांनीही परिसरात दुचाकीचा शोध घेतला, मात्र आढळून आली नाही. अखेर गुरुवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमाकांत चौधरी हे करीत आहेत.