पर्यावरण प्रेमींच्या मोठ्या अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:53 PM2019-05-29T12:53:44+5:302019-05-29T12:54:16+5:30

अपेक्षा

Big Expectations of Environmental Lovers | पर्यावरण प्रेमींच्या मोठ्या अपेक्षा

पर्यावरण प्रेमींच्या मोठ्या अपेक्षा

Next

नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली.उन्मेश पाटील यांची खासदार म्हणून निवड झाली. आम्हा वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमी लोकांच्या त्यांच्याकडून फारआहे. तसा खान्देश हा पर्जन्यमानात उत्तम असा प्रदेश होता. बाराही महिने नद्या-नाले, तलाव विहरी तुडूंब भरल्या असत. परंतु गेल्या १० ते १५ वर्षात प्रचंड वृक्षतोड, शहरीकरण, राष्टÑीय महामार्गमुळे दुतर्फा झाडी तोडली गेली व वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन याबाबत प्रचंड शासकीय उदासिनता तर नागरिकांकडे साधन व सामग्रीची कमतरता त्यामुळे फक्त कागदावरच वृक्षरोपण दिसून येते. दरवर्षी त्याच जागेवर वृक्षरोपण होऊन नंतर देखभाल अभावी ती रोपे मरून जातात. उन्मेश पाटील यांनी स्वत: लक्ष घालून आता या वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला चळवळीचे स्वरूप देऊन पुन्हा खान्देश हिरवागार व संपन्न करावा ही अपेक्षा. त्यांनी जर सामाजिक संस्था, रोटरी, लायन्स, जेसीस, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ग्रामपंचायत, नगरपालिका, म.न.पालिका, जिल्हा परिषद इ. व त्यांच्या सोबत प्रशासन सामाजिक वनीकरण आणि वनविभाग यांच्या संयुक्तविद्यमाने ५ वर्षाचा एक कलमी कार्यक्रम लावला तर या जिल्ह्याचे तापमान २ ते ३ अंशने कमी होऊ शकते. खासदारांनी वृक्ष लागवडीच्या स्पर्धा लावाव्या. संस्थांना शासनातर्फे मोफत रोपे व पाणी पुरवठा करावा, त्यांना योग्य बक्षीस द्यावे. शकतोवर दाट सावलीची झाडे लावावी. शहरात गेल्या ३० वर्षांपासून वृक्ष लागवडीच्या प्रयत्नात चांगले यशस्वी झालो. प्रशासन, नागरिक, सामाजिक संस्था, व्यक्तींंची उत्तम साथ आहे.
- विजय वाणी, पर्यावरण प्रेमी

Web Title: Big Expectations of Environmental Lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव