सुवर्णबाजारात मोठी पडझड, एकाच दिवसात चांदी दोन हजाराने घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:15+5:302021-06-20T04:13:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीत सुरू असलेली घसरण कायम असून, शनिवारी तर चांगलीच पडझड झाली. ...

A big fall in the gold market, silver fell by two thousand in a single day | सुवर्णबाजारात मोठी पडझड, एकाच दिवसात चांदी दोन हजाराने घसरली

सुवर्णबाजारात मोठी पडझड, एकाच दिवसात चांदी दोन हजाराने घसरली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीत सुरू असलेली घसरण कायम असून, शनिवारी तर चांगलीच पडझड झाली. यामध्ये चांदीचे भाव एकाच दिवसात दोन हजाराने घसरून ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली तर, सोन्याचेही भाव ६०० रुपयांनी कमी होऊन ते ४७ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. कच्च्या तेलातील भाववाढीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची मागणी घटल्याने सोने-चांदीचे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वच व्यवहारावर परिणाम झाल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढून या दोन्ही मौल्यवान धातूंनी भावातील उच्चांकी गाठली होती. त्यानंतर काहीशी घसरण झाली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंधादरम्यान सुवर्ण बाजार बंद राहिला तरी कमोडिटी मार्केटमध्ये भाववाढ होत राहिली. आता अनलॉकनंतर काही दिवस भाव चढेच राहिले. मात्र गेल्या आठ ते नऊ दिवसापासून सातत्याने घसरण होत आहे.

यामध्ये शनिवार, १९ जून रोजी तर मोठी घसरण झाली. यामध्ये चांदीचे भाव दोन हजाराने घसरले व ती ७१ हजार ५०० रुपयांवरून ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली तर, सोन्याचेही भाव ६०० रुपयांनी कमी होऊन ते ४८ हजार ५०० रुपयांवरून ४७ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.

औद्योगिक मागणी कमी

सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. त्यानुसार आताही तसाच परिणाम झाला आहे. एकीकडे कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम होऊन सोने-चांदीत घसरण होत आहे. तसेच कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची औद्योगिक मागणी कमी झाली असून, त्यामुळे भाव कमी होण्यास मदत होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. असे असले तरी सुवर्णनगरी जळगावात सोने-चांदीला अजूनही चांगली मागणी आहे.

———————————

कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम होऊन सोने-चांदीचे भाव कमी होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची औद्योगिक मागणीही कमी झाल्याने त्याचाही परिणाम होत आहे. असे असले तरी जळगावात सोने-चांदीला चांगली मागणी आहे.

- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक.

Web Title: A big fall in the gold market, silver fell by two thousand in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.