किराणा घेण्यासाठी आलेल्या पोलिसाची १५ मिनिटात दुचाकी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:54+5:302021-05-08T04:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. किराणा घेण्यासाठी आलेल्या पोलिसाची १५ मिनिटात दुचाकी गायब केली. तर वडिलांना हाॅस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची दुचाकी चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना क्र. १ ..
वडिलांना भेटण्यास आलेल्या शेतकऱ्याची दुचाकी लंपास
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील अनंत प्रकाश महाजन यांच्या वडिलांवर भजे गल्लीतील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. त्यामुळे ३० मार्च रोजी सायंकाळी ते त्यांच्या दुचाकीने (क्र.एमएच.19.सीए.4395) वडिलांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी हॉस्पिटलच्या समोर दुचाकी उभी केली होती. त्यानंतर दुचाकी दिसून आली नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल आहे. तपास अजित पाटील करीत आहे.
घटना क्र. 2
किराणा घेण्यासाठी आलेल्या पोलिसाची दुचाकी लांबविली
किराणा घेण्यासाठी मणियार होलसेल दुकानात आलेल्या पोलिसाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय नवल अहिरे हे वाघ नगरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. बुधवार, ४ मे रोजी ११ वाजेच्या सुमारास ते मणियार होलसेल दुकानात किराणा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी दुकानाबाहेर दुचाकी (एमएच १९ सीकी ४०४५) उभी केली होती. १५ मिनिटानंतर किराणा खरेदी करून आल्यानंतर आटोपून त्यांना दुचाकी जागेवर मिळून आली नाही. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.