दुचाकी रॅली, मिरवणुकांनी लक्ष वेधले
By admin | Published: February 20, 2017 01:10 AM2017-02-20T01:10:38+5:302017-02-20T01:10:38+5:30
अनेर-बोरी परिसर : शिवजयंती जल्लोषात साजरी, ढोल पथकांनी वेधले लक्ष, आकर्षक रांगोळ्या काढल्या
अमळनेर/चोपडा/पारोळा : ढोल पथकांचा निनाद, गगनभेदी घोषणा, दुचाकी रॅली तसेच भव्य मिरवणुका काढून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अनेर-बोरी परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या रांगोळ्यांनी लक्ष वेधले होते.
अमळनेर
शिवजयंतीनिमित्त शहरात उत्साह, चैतन्याचे वातावरण होते. अनेकांनी आपल्या दुचाकी-चारचाकींवर भलेमोठे भगवे ध्वज लावल्याने, सर्वत्र भगवामय वातावरण निर्माण झाले होते. तरुणवर्ग भगवे ध्वज लावलेल्या दुचाकी शहराच्या विविध भागातून नेत असताना, या ध्वजांनी सर्वाचेच लक्ष वेधले होते.
भागवत रोडवर असलेल्या शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. विद्युत रोशणाई करण्यात आलेली होती. तसेच अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. विविध भागातून मिरवणुकाही काढण्यात आल्या.
शिरीष चौधरी मित्र परिवारातर्फे अश्वारूढ पुतळ्याचे पूजन
सकाळी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिराबाहेरील 18 फुटी अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा उघडा करून त्याची स्वच्छता केली. त्यानंतर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी न. पा. गटनेते प्रवीण पाठक, श्रीराम चौधरी, सुनील भामरे, उदय पाटील, महेश देशमुख, भाऊसाहेब महाजन, सलीम टोपी, किरण सावंत, पंकज चौधरी, किरण बागुल, संतोष लोहरे, पंकज साळी, पराग चौधरी, अॅड. गोपाल पाटील, रणजित शिंदे, सोपान सोनार, सुरेश पाटील, गोपी कासार, विजेंद्र शिरसाळे, शशांक संदानशिव, स्वामी चौधरी, नितीन लोहरे, गुलाबनबी, नरेश कांबळे, लक्ष्मण महाजन, दीपक चौगुले, किरण गोसावी यांच्यासह अनेकजण हजर होते.
शिवजयंती उत्सव
समितीतर्फे मिरवणूक
शिवजयंती उत्सव समितीतर्फे अध्यक्ष डॉ. भूषण पाटील व सचिन भामरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मराठा मंगल कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. युनियन बॅँक, प्रांत बंगला, बळीराजा चौकार्पयत ही मिरवणूक काढण्यात आली. भगवा फेटा बांधलेल्या महिला मिरवणुकीच्या अग्रभागी होत्या. घोडय़ावर प्रतीकात्मक बालशिवाजी व जिजाऊ विराजमान झाल्या होत्या. मिरवणूक बळीराजा चौकात आल्यानंतर महिलांनी फुगडीचा आनंद लुटला. जिजाऊ दरवाजावरील शिवाजी महाराज व जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रांत पाटील, नगरसेवक विवेक पाटील, राजेश पाटील, संजय मराठे, अभिषेक पाटील, साखरलाल महाजन, बाबू साळुंखे, प्रा.शीला पाटील, प्रतिभा पाटील, अॅड. तिलोत्तमा पाटील, भारती सोनवणे, डॉ. विद्या हजारे आदी सहभागी झाल्या होत्या.
चोपडा
शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सजावट करण्यात आली होती. सकाळपासून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणा:यांची रीघ लागली होती. त्यात सर्वपक्षीय नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला होता.
सकाळी 11 वाजता मल्हारपुरा शेजारील भवानीमाता मंदिरात पूजा करण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात, शिस्तबद्ध असे लेझीम खेळून भवानीमाता मंदिरापासून शहरातील सर्व मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढली. ही मिरवणूक आशा टॉकीज, गोल मंदिर, चावडी, मेन रोड, आंबेडकर पुतळामार्गे शिवाजी चौकार्पयत नेण्यात आली. मिरवणुकीत घोडय़ांवर प्रतीकात्मक शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील लहान मुले स्वार झाले होते.
मोटारसायकल रॅली
सकाळी शहरातून तरुणांनी मोटारसायकलला भगवे ङोंडे बांधून मेन रोडवरून मोटारसायकल रॅली काढली होती. संपूर्ण शहर भगवामय झाले होते. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांच्या निनादात मिरवणूक पुढे सरकत होती. मराठे गल्लीतील अरुण वाघ यांची, मल्हारपुरा नितीन पवार, भवानी माता मंदिरापासून दिव्यांक सावंत, चेतन कानडे, प्रवीण मराठे यांची, मराठे गल्लीतील दुसरी मिरवणुकीचा आणि सायंकाळी शिंदेवाडा भाई कोतवाल रोड परिसरातील रमेश पाटील यांच्या मिरवणुकीचा सहभाग होता. मिरवणुकीत दिनेश बाविस्कर, डॉ. रोहन पाटील, मंगेश पाटील, तन्मय बाविस्कर, पंकज नरवाडे, स्वप्नील देशमुख, नितीन पवार, योगेश मराठे, बबलू पाटील, कुलदीप पाटील, नीलेश पाटील, भावेश पाटील, राहुल पाटील, विजय मराठे, विजय पाटील यासह असंख्य नागरिक, समाज सहभागी झाला होता.
चोख पोलीस बंदोबस्त
दरम्यान, पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह पोलीस कर्मचा:यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.
माध्यमिक विद्यालय
महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक सुनील चौधरी, संजय बारी, सागर विसपुते, विजय शेलार, मुख्याध्यापिका प्रभावती पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. संजय बारी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन भावेश लोहार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत दीपक शुक्ल यांनी केले.
पारोळा
येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटनांनी सहभाग घेतला. सकाळी 10 वाजेपासून राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवभक्तांनी गर्दी केली होती. यावेळी संपूर्ण शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शेकडो कार्यकत्र्यानी वाहनांना भगवे ङोंडे लावलेले असल्याने, परिसर भगवामय झाला होता.
रक्तदान शिबिर
मराठा सेवा संघ, शिक्षक संघ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 117 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक दीपक अनुष्ठान, मनीषा पाटील, संजय पाटील, डी.बी.पाटील, पराग मोरे, हजर होते. रक्तदात्यांना शिवप्रतिमेचे वाटप करण्यात आले. जितेंद्र पाटील, देवीदास सोनवणे, अनिल चौधरी, सुनील वाघ, दीपक गिरासे, दिलीप पाटील, संदीप पाटील, सुनील जाधव आदींनी परिश्रम घेतले.
सायंकाळी मिरवणूक
संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शिव कॉलनी परिसरातून निघालेल्या मिरवणुकीत नगराध्यक्ष करण पवार, विवेक पाटील, विक्रांत पाटील, पी.जी.पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील, आशिष पाटील यांच्यासह शेकडो नागरिक हजर होते. (वार्ताहर)
मिरवणुकीत महाविद्यालयीन तरुणींच्या ढोल पथकाने सर्वाचे लक्ष वेधले होते. एका तालात सर्व तरुणी जल्लोषात ढोल वाजवत होत्या. ढोल पथक तयार करण्यासाठी मोनाली पाटील, ऋचिता सूर्यवंशी, वसुंधरा लांडगे, वर्षा पाटील, प्रशांत भदाणे आदींनी परिश्रम घेतले.
4या मिरवणुकीत महिलांनीही फेटे बांधलेले होते. अमळनेरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय शहराच्या विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.