कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 03:33 PM2019-05-31T15:33:42+5:302019-05-31T15:33:51+5:30

पाचोरा - भडगाव रोडवरील घटना : उपचारादरम्यान झाले निधन

Bike Wheel in the Car | कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next


पाचोरा : कार व दुचाकीच्या २३ मे रोजी झालेल्या अपघातातील जखमी पवन वसंत चनाडे (५०) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार २३ मे रोजी कार व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला होता. २३ मे रोजी पाचोरा- भडगाव रोडवर संध्याकाळी ६.३० चे सुमारास ही घटना झाली होती. त्यात कार क्रमांक एम एच ४१-६४५७ वरील चालकाने दुचाकीस्वार पवन वसंत चनाडे (वय ५०) याला धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी पवन चनाडे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. पवन चनाडे यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी नरेश आदिवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जखमी पवन चनाडे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोष केला.

Web Title: Bike Wheel in the Car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात