वीजपुरवठा नसताना बील, ग्राहकाचा दावा खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:21+5:302021-07-09T04:12:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अर्ज करूनही वीजपुरवठा न देताच वीजबिल दिल्याचा संजय जोशी या ग्राहकाचा दावा खोटा असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अर्ज करूनही वीजपुरवठा न देताच वीजबिल दिल्याचा संजय जोशी या ग्राहकाचा दावा खोटा असल्याचे स्पष्टीकरण महावितरण कंपनीने दिले आहे. शिवाय त्यांना दिले गेलेले ८८ हजार रुपयांचे बील योग्य असल्याचेही महावितरणने म्हटले आहे.
डिकसाई शिवारात स्थळ परीक्षण केल्यानंतर संजय लक्ष्मण जोशी या नावाने क्रॉम्प्टनच्या काळात २५ मार्च २०१४ रोजी वीजजोडणी दिल्याचे आढळले आहे. या जागेवर जोशी यांची बोअरवेल असून ९० फुटाच्या अंतरावर महावितरणची लघुदाब विद्युत वाहिनी आलेली आहे. त्यांनी यापूर्वी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी १५ हजार ८०० रुपये रकमेचा भरणाही केलेला आहे. संजय जोशी हे विजेचा वापर करत असून ते नियमित ग्राहक असल्याचे महावितरणने म्हटले आहे. दरम्यान, त्यांचे मार्च महिन्याचे ८८ हजार १२० रुपये बील योग्यच असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.