कोट्यवधींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:32+5:302021-06-22T04:12:32+5:30

कासोदा : विजेचे बिल न भरल्याने येथील सहा गावांचा पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...

Billions owed | कोट्यवधींची थकबाकी

कोट्यवधींची थकबाकी

Next

कासोदा : विजेचे बिल न भरल्याने येथील सहा गावांचा पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात उत्राण युनिटची थकबाकी ९३,९२,०७० रुपये, तर कासोदा युनिटची २५,०३,१८० रुपये थकबाकी आहे.

उजनी जंगलात

हवा पोलीस बंदोबस्त

बोदवड : उजनी जंगल शिवारात पिस्तूल लावून रस्ता लूट करण्यात आली. एका दाम्पत्याला झाडाला बांधून मारहाण करत लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या जंगलात किमान दोन ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

चक्रीवादळात जीव गमावलेल्या

मृतांच्या वारसांना मदत

अमळनेर : गेल्या महिन्यात आलेल्या चक्रीवादळात जीव गमावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदतीचा धनादेश देण्यात आला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते धनादेश तहसील कार्यालयात त्यांच्या वारसांना देण्यात आले.

Web Title: Billions owed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.