पाल ग्रामीण रुग्णालयात २९ महिलांवर बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:13+5:302021-07-04T04:13:13+5:30

रावेर : तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील पाल ग्रामीण रुग्णालयात २९ महिलांवर बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात करण्यात आल्या. जिल्हा ...

Bintaka Family Planning Surgery Camp for 29 Women at Pal Rural Hospital | पाल ग्रामीण रुग्णालयात २९ महिलांवर बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर

पाल ग्रामीण रुग्णालयात २९ महिलांवर बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर

Next

रावेर : तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील पाल ग्रामीण रुग्णालयात २९ महिलांवर बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात करण्यात आल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्या पुढाकाराने आदिवासी भागातील कुटुंब नियोजन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पाल ग्रामीण रुग्णालयात बिन टाका शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.

शिबिरात पाल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला यांनी २९ महिलांवर बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, डॉ. सचिन पाटील डॉ. विजया झोपे (खिरोदा ), डॉ. नीरज पाटील (लोहारा), डॉ. चंदन पाटील (निंभोरा ), डॉ. मोरे (थोरगव्हाण) डॉ. अनुपम अंजलसोंडे (वाघोड), डॉ. योगेश उंबरकर (लोहारा) यांच्यासह समन्वयक रामभाऊ पाटील, महेमूद तडवी यांच्यासह मुख्य अधिपरिचारिका कल्पना नगरे व सहकारी परिचारिका, कक्षसेवक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांनी पाल ग्रामीण रुग्णालयाला एका आदर्श रुग्णालयात सर्वांनी मिळून बनवू या, असे आवाहन करीत अधिकाधिक सुविधा उपलब्ध करवून देऊ, असेही नागरिक व पत्रकार यांच्याशी चर्चा करताना सांगितले. यावेळी जळगाव येथील पवन जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Bintaka Family Planning Surgery Camp for 29 Women at Pal Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.