बर्ड फ्लू : जळगाव जिल्ह्यात होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:01+5:302021-01-08T04:50:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हिमाचल प्रदेश आणि केरळ या दोन राज्यांमध्ये बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला आहे. अद्याप राज्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हिमाचल प्रदेश आणि केरळ या दोन राज्यांमध्ये बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला आहे. अद्याप राज्यात त्याचा प्रादुर्भाव दिसून आलेला नसला तरी प्रशासन मात्र त्यासाठी सतर्क झाले आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागालादेखील सतर्क राहण्याचे आदेश मिळालेले आहेत.
प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाने या बर्ड फ्लू संदर्भात दुपारी आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाणवठे किंवा जेथे पक्षी जास्त येतात. त्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच धरण किंवा अभयारण्यातदेखील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात. तेथे मृत पक्षी आढळलेल्या धरणांवरील उपअभियंता आणि अभयारण्यांसाठी वनविभागाने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या अडचणींवर निवारण करण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीमची स्थापना करण्यात आली आहे. स्थलांतरित पक्षी हे अजून जळगावपासून जवळपास एक हजार किमी अंतर लांब आहेत. त्यामुळे ते येथे कधी येतात किंवा येणारही नाहीत. त्यामुळे अजून तरी जळगावमध्ये बर्ड फ्लूचा धोका नाही, असेही त्यांनी सांगितले. या पक्षांमध्ये आढळून येणारा विषाणूचा स्ट्रेन हा माणसांसाठी धोकेदायक नसल्याचेही त्यांनी सांगितले.