पूर्णा नदीच्या पाणथळावर गुंजताहेत पक्ष्यांचे किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 08:07 PM2019-04-01T20:07:57+5:302019-04-01T20:11:47+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या खामखेडा पुलाजवळील पाणथळ जागेवर विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे थवे दिसत असल्याने वाटसरूंना अगदी थांबवत असून भुरळ घातली आहे.

Birds twist in poona of purna river | पूर्णा नदीच्या पाणथळावर गुंजताहेत पक्ष्यांचे किलबिलाट

पूर्णा नदीच्या पाणथळावर गुंजताहेत पक्ष्यांचे किलबिलाट

Next
ठळक मुद्देसकाळचा देखावा मनोहारीसहज वावर, अन्न मिळविण्यासाठीची धडपड डोळ्यांचे पारणे फेडणारी



चंद्रमणी इंगळे
हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या खामखेडा पुलाजवळील पाणथळ जागेवर विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे थवे दिसत असल्याने वाटसरूंना अगदी थांबवत असून भुरळ घातली आहे.
हिरव्यागार वेलींनी बहरलेल्या नदी किनाऱ्यावर विविध प्रजातीच्या जणू शाळा व संमेलन भरल्याचे विहंगम दृष्य पाहून मन हेलावते.
सकाळी दाणा-पाण्यासाठी पक्ष्यांचा किलबिलाट नदी पाणथळावर दररोज निसर्ग प्रेमींची दाद मिळवून गेला आहे. पांढरे शुभ्र बागळे, फ्लेमिंगो परदेशी पाहुण्यांसह विविध प्रकारच्या शेकडो प्रजाती पक्षी पहावयास मिळत असून, रंगी-बेरंगी काही पक्ष्यांनी विहार केला आहे.
काही अंशी येथूनच मानवी वापर असला तरी पक्ष्यांचा सहज वावर अन्न आणि पाणी मिळवण्याची त्यांची धावपळ डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
सकाळी पक्ष्यांच्या गुंजणाऱ्या किलबिलाटाने वाटसरू पाहून थक्क होतो. अनुकूल वातावरण व हवामान येथे आहे. खाद्य उपलब्धतेमुळे येथे पक्षी विहार बहरला आहे. पाणथळ जागी स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होत आहे.
अन्नाच्या शोधात
पावसाळा, हिवाळ्यातील पक्ष्यांची विहिरे सजलेली दिसतात. मात्र उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावली असताना खाद्याच्या शोधात पक्षी स्थलांतर करतात. किलबिल पक्षी निसर्गरम्य वातावरणात गारवा जाणवत राहते. माणसालादेखील जगण्यासाठी धडपडावे लागते. याचे पक्ष्यांकडून बोध घेणे गरजेचे आहे.

Web Title: Birds twist in poona of purna river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.