जन्ममृत्यू नोंदणीचा कारभार तिघांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2017 12:14 AM2017-03-23T00:14:05+5:302017-03-23T00:14:05+5:30

आस्थापनाचा अडेलतट्टपणा: नगरसेविका जयश्री पाटील यांची तक्रार

Birth control registers on three | जन्ममृत्यू नोंदणीचा कारभार तिघांवर

जन्ममृत्यू नोंदणीचा कारभार तिघांवर

Next

जळगाव : मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागचा कारभार सध्या वरिष्ठ लिपिक व दोन मजूर कर्मचारी यांच्यावरच सुरू आहे. या विभागाने आस्थापना विभागाकडे तीन कर्मचा:यांची मागणी करूनही आस्थापना विभागाकडून एमएससीआयटी झालेले कर्मचारी नसल्याचे उत्तर देत असून टाळाटाळ करीत असल्याची तक्रार नगरसेविका जयश्री पाटील यांनी  मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील महिन्यापासून शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी आपल्या मुलांचे जन्माचे दाखले काढण्यासाठी मनपातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागात गर्दी होण्याची शक्यता आहे. परंतु या विभागात वरिष्ठ लिपिक व दोन कर्मचारी असून त्यांच्यावरच या विभागाचे पूर्ण कामकाज अवलंबून आहे. या विभागाने आस्थापना विभागास एमएस-सीआयटी झालेल्या तीन कर्मचा:यांची मागणी केली असता मनपात एमएससीआयटी झालेले कर्मचारी नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने 103 कर्मचा:यांची भरती झालेले सर्व कर्मचा:यांनी एमएससीआयटी झाल्याचे प्रमाणपत्र दिले असल्याचे कळविले. त्यावर आस्थापना विभागाने 150 कर्मचा:यांची यादी या विभागास पाठविली व तुम्हीच सांगा यातील तीन कर्मचारी कोण द्यायचे ते? अशी विचारणा केली आहे. वास्तविक हे आस्थापना विभागाचे काम आहे.

Web Title: Birth control registers on three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.