न्हावी येथे सद्गुरू शास्त्री नीलकंठदास यांच्या जन्मशताब्दी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 03:43 PM2019-12-05T15:43:05+5:302019-12-05T15:43:19+5:30
सद्गुरू शास्त्री नीलकंठदास यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने न्हावी येथे स्वामिनारायण भगवान यांच्या चरणविंद छत्रीची स्थापना नुकतीच करण्यात आली.
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : सद्गुरू शास्त्री नीलकंठदास यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने न्हावी येथे स्वामिनारायण भगवान यांच्या चरणविंद छत्रीची स्थापना नुकतीच करण्यात आली.
त्या छत्रीखाली परिसरातील हरिभक्तांद्वारे लिखित पाच कोटी पन्नास लाख स्वामिनारायण महामंत्र पोथी (वही) प.पू. सद्गुरू शास्त्री श्री धर्मप्रसाददासजी, शास्त्री भक्तीप्रकाश दासजी, शास्त्री भक्तीस्वरूपदासजी समस्त यजमान व स्वामिनारायण मंदिर न्हावी येथील ट्रस्टी मंडळ यांच्या हस्ते छत्री खाली स्थापन करण्यात आल्या.
या कार्यक्रमात प.पू. सद्गुरू शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी यांचे आशीर्वचन झाले. त्यात त्यांनी मनुष्याने मोक्ष कसा प्राप्त करावा तसेच सेवा केल्यास प्राप्त होणाऱ्या फळाचे महत्त्व सांगितले. त्यानिमित्त श्रीजी चरणारविन्द खाली वही स्थापन सोहळा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेमधे सर्व संतांची बैलगाडी रथातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये न्हावी येथील महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ व न्हावी परिसरातील सर्व हरिभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी प.पू. सद्गुरू शास्त्री श्री भक्तीस्वरुपदासजी, प.पू. सद्गुरू शास्त्री श्री धर्मप्रकाशदासजी, स्वामी हरिप्रकाशदासजी, समस्त यजमान व परिसरातील हरिभक्त उपस्थित होते.