छत्रपती संभाजी राजेंना जयंतीदिनी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:16 AM2021-05-15T04:16:05+5:302021-05-15T04:16:05+5:30
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे ...
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे हे वीर योद्धे होते, त्यांनी त्यांच्या ३२ वर्षाच्या आयुष्यात २१० लढाया लढल्या व त्यातील एकही लढाई ते हरले नाहीत. तसेच राजे लेखक होते. बुधभूषण या ग्रंथाचे लेखन केले होते. असा अंजिक्य व योद्धा राजा मराठा साम्राज्याचा छत्रपती होता. हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या राजांची जयंती जळगाव शहरातील हिंदू व मुस्लीम बांधवांनी साजरी केली. राजांची वंदन व अभिवादन सभा जळगाव शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आली होती. या प्रसंगी पुरुषोत्तम चौधरी, मुक्तार शहा, अफान शहा, संजय चव्हाण, सुजीत शिंदे, खुशाल चव्हाण, आर.डी. पाटील, जितू पाटील, सुनील लाड, धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
-----
संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी केतन पाटील, हरीश पाटील, पीयूष पाटील, शिवम पाटील, देवेंद्र मराठे, जितेंद्र चौथे, सचिन पाटील, नंदू पाटील तसेच सर्व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
-----
बहुभाषिक ब्राह्मण संघ
बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगाव महानगरतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भोसले जयंती दक्षिणमुखी हनुमान मंदिर गोलाणी मार्केट येथे साजरी करण्यात आली. अध्यक्ष अशोक वाघ यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्या प्रसंगी उपाध्यक्ष मोहन तिवारी, माजी अध्यक्ष संजय व्यास, लेखराज उपाध्ये, सुरेन्द्रजी मिश्रा, शिवजी शर्मा, महेन्द्र पुरोहित, किशन अबोटी, रितेश पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी धर्मवीर संभाजी महाराजांचे धर्मा साठी बलिदान व कार्य ह्या संदर्भात मोहन तिवारी यांनी माहिती दिली.