पाचोºयात जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्याने केला हवेत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:14 PM2019-11-23T23:14:13+5:302019-11-23T23:15:45+5:30
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुत-यावर असतानाच तेथून एका कार्यकर्त्याने पिस्तुलने हवेत गोळीबार केला.
जळगाव : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुत-यावर असतानाच तेथून एका कार्यकर्त्याने पिस्तुलने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात पाचोरा येथील पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांना विचारले असता, प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती निष्पन्न झाली असून त्याच्या शोधासाठी एक पथक पाठविण्यात आले आहे. त्याच्याकडे परवाना असल्याची माहिती मिळाली आहे, मात्र चौकशीतच पिस्तुल कोणते व परवाना आहे का? हे निष्पन्न होईल, अशी माहिती कातकाडे यांनी ‘लोकमत’ ला दिली. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना विचारले असता पाचोरा पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा पध्दतीने हवेत गोळीबार करता येतो का? या प्रश्नावर डॉ.उगले यांनी चौकशीनंतर स्पष्ट होईल असे सांगितले.