मतिमंद मुलांसाठी भोईटे शाळा मिळावी म्हणून भाजपाचा सभात्याग
By admin | Published: June 20, 2017 04:29 PM2017-06-20T16:29:39+5:302017-06-20T16:29:39+5:30
महासभेपूर्वी भाजपा नगरसेवक, पालक व विद्याथ्र्याचा महापौरांना घेराव. पर्यायी जागेचे आश्वासन दिल्यावरही भाजपाचा चर्चेचा अट्टाहास. परवानगी नाकारल्याने नाराजी. प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन.
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.20- उत्कर्ष मतिमंद विद्यालयाला मनपाच्या भोईटे शाळेची इमारत मिळावी, या मागणीसाठी मतिमंद विद्याथ्र्यासह पालक तसेच भाजपा नगरसेवक रवींद्र पाटील यांनी मंगळवारी महासभेपूर्वीच मनपात येऊन प्रवेशद्वारावर महापौरांना घेराव घातला. महापौरांनी गावातच पर्यायी जागेचे आश्वासन दिल्यावरही महासभा सुरू होताच भाजपा सदस्यांनी या विषयावर चर्चेचा आग्रह धरला. मात्र परवानगी नाकारल्याने नाराज भाजपा सदस्यांनी सभात्याग केला.
दरम्यान, काही पालकांनी सभागृहात घुसण्याचा प्रय} केला. त्यांना बाहेर काढल्याने सभागृहाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी लाथा मारल्या. अखेर भाजपा नगरसेवकांसह या नागरिक व पालकांनी मनपा सतरा मजली इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेर पाय:यांवर ठिय्या आंदोलन केले.
काय आहे मागणी
इन्स्टिटय़ूट फॉर रूरल डेव्हलपमेंड अॅण्ड सोशल सव्र्हिसेस जळगाव संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालय ही शाळा शहर व आजूबाजूच्या परिसरातील मतिमंद मुलांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी 1989 पासून खोटेनगर परिसरात जीवराम नगरात सुरू आहे. त्यात शहरातील विविध भागातून 99 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी केवळ 40 विद्याथ्र्यानाच शासनाकडून अनुदान तत्वावर मान्यता मिळालेली आहे. उर्वरीत 59 विद्याथ्र्याना अनुदान नसल्याने संस्थेला आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यातच शाळा शहराच्या एका टोकाला असल्याने मुलांना स्कूल बसने ने-आण करावे लागते. मात्र संस्थेकडे एकच स्कूलबस असल्याने दोन फे:या माराव्या लागतात. विद्याथ्र्याना बसमधून लांबवर नेणे अवघड होत असल्याने शहरात मध्यवर्ती भागात जागा मिळावी, अशी मागणी संस्थेकडून होत आहे. ठिय्या आंदोलनात संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश अग्रवाल व नगरसेवक रवींद्र पाटील यांच्यासह नागरिक सहभागी झाले.