पोटनिवडणुकीत भाजपाने राखला गड
By admin | Published: January 12, 2016 01:08 AM2016-01-12T01:08:28+5:302016-01-12T01:08:28+5:30
भुसावळ : अत्यंत चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा भाजपाच्या बाजूने कौल दिला़
भुसावळ : अत्यंत चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी पुन्हा भाजपाच्या बाजूने कौल दिला़ प्रभाग तीन क मधून परीक्षित ब:हाटे 269 मतांनी तर प्रभाग सहा अ मधून मेघा देवेंद्र वाणी 710 मतांची आघाडी (लीड) मिळवून विजयी झाल्या़ विजयानंतर भाजपा पदाधिका:यांनी ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करीत विजयी मिरवणूक काढली़ ही निवडणूक म्हणजे आगामी नगरपालिका निवडणुकीची रंगीम तालीम असल्याने शहरवासीयांचे निकालाकडे लक्ष लागून होत़े उत्कंठा अन् जल्लोष पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याविषयी मोठी उत्सुकता असल्याने सकाळी नऊ वाजेपासून पालिकेच्या आवाराबाहेर विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठी गर्दी होती़ मतमोजणीची फेरी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिका:यांनी उद्घोषणा करताच भाजपाच्या बाजूने कौल दिसताच भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी जल्लोष करीत होत़े बॅरिकेट्स लावून वाहतूक रोखली पोटनिवडणुकीत कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी बाजारपेठचे पोलीस निरीक्षक नजन-पाटील यांच्यासह सहायक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक आशिष शेळके, नरेंद्र साबळे व डीबी कर्मचा:यांनी चोख बंदोबस्त लावला होता़ वाहतूक शाखेचे कर्मचारीदेखील वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेत होत़े रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावून मतमोजणी होईर्पयत रस्ता तासभर बंद करण्यात आला़ भाजपाने राखला गड पोटनिवडणूक घेण्यात आलेल्या दोन्ही प्रभागात यापूर्वी भाजपाचे सदस्य निवडून आले होत, मात्र व्हीप झुगारल्याप्रकरणी भावना अजय पाटील व अजय भोळे यांना अपात्र व्हावे लागले होत़े त्यामुळे भाजपासाठी हा गड राखण्याचे आव्हान होत़े समीकरणे बदलणार भाजपाने दोन्ही जागांवर यश मिळवल्याने भाजपाकडे 11, खाविआचे आठ, अपक्ष तसेच मीना आघाडीचा एक सदस्य सोबत असल्याने विरोधकांचे संख्याबळ 24 झाले आह़े त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता आह़े