भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:15 AM2021-03-18T04:15:38+5:302021-03-18T04:15:38+5:30
बाळासाहेब चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता पत्नी ज्योती हिने ...
बाळासाहेब चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता पत्नी ज्योती हिने सांगितले की, महापौरपदाची निवडणूक असल्याने भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्यासोबत नाशिक येथे जात आहे. त्यानंतर पत्नी नाशिक येथे अनीग गिव्ह रिसोर्ट, तळवाले गाव, त्र्यंबकेश्वर येथे असल्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून समजले. दुसऱ्या दिवशी पत्नीचा शोध घेण्यासाठी नाशिक येथे दुपारी ४ वाजता गेलो असता स्थानिक पोलीस निरीक्षक त्या रिसोर्टवर सोबत आले व त्यांनी दीपमाला काळे यांच्या मोबाइलवरून पत्नीशी बोलणे करून दिले. त्यानंतर पत्नीच्या मोबाइलवर वारंवार कॉल केले; पण संपर्कच झाला नाही. पत्नीचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने कुठे तरी निघून गेल्याची खात्री झाल्यावर चव्हाण यांनी बुधवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून पत्नी हरविल्याची तक्रार दिली.
महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमधील फुटीर नगरसेवकांचा गट हा अज्ञात ठिकाणी आहे. गुरुवारी ऑनलाइन सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार असल्यामुळे अज्ञात ठिकाणी राहूनसुद्धा मतदान करता येणार आहे.