फडणवीस-महाजनांचं खडसेंसोबत चहापान; पण 'कपातील वादळ' जैसे थे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 12:33 PM2020-01-03T12:33:52+5:302020-01-03T12:58:21+5:30

जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली.

Bjp devendra fadnavis and eknath khadse meeting in jalgaon | फडणवीस-महाजनांचं खडसेंसोबत चहापान; पण 'कपातील वादळ' जैसे थे!

फडणवीस-महाजनांचं खडसेंसोबत चहापान; पण 'कपातील वादळ' जैसे थे!

Next
ठळक मुद्देजळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. चर्चेदरम्यान खडसे यांनी आपल्या नाराजीबद्दल मौन बाळगले आहे. 'देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातली सभा घेण्यासाठी जळगावात आले होते.'

जळगाव - देवेंद्र फडणवीसगिरीश महाजन यांच्यामुळे आपले विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दुसऱ्याच दिवशी यू टर्न घेतला. माझ्यात व गिरीश महाजन यांच्यात सर्व आलबेल आहे, असे सांगून आपण फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केलेच नसल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी (3 जानेवारी) जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही राजकीय भेट झाली.

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि  गिरीश महाजन यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र या चर्चेदरम्यान खडसे यांनी आपल्या नाराजीबद्दल मौन बाळगले आहे. देवेंद्र फडणवीस हे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातली सभा घेण्यासाठी जळगावात आले होते. माझ्या नाराजीबाबत कोणतीही चर्चा त्यांच्यासोबत झाली नाही असं खडसे यांनी सांगितलं आहे. 'देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावं पाठवली होती. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आमची चर्चा झाली. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही' असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 

All the talk between us and Girish Mahajan; Khadse


फडणवीसांचा गुंगारा

दोन दिवसांपूर्वी खडसे यांनी थेट फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केल्याने याबद्दल फडणवीस काहीतरी स्पष्टीकरण देणार असे सर्वांना वाटत असताना फडणवीस यांनी माध्यमांशी बोलणे टाळले व थेट हेलिकॉप्टरमध्ये बसून धडगावकडे रवाना झाले.

खडसेंचे नाराजीबद्दल मौन

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खडसे व महाजन यांनी यावेळी केवळ जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. खडसे यांनी नाराजी कायम आहे का, या बद्दल बोलणे टाळत मौन बाळगले. त्यामुळे त्यांची अद्यापही नाराजी कायम असल्याचे चित्र या वेळी दिसून आले.

विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच जाणीवपूर्वक माझे तिकीट कापले. त्यांना माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणायची होती, असा आरोप खडसे यांनी बुधवारी केला होता. याच विषयासंदर्भात गिरीश महाजन यांनी गुरुवारी दुपारी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत खडसे यांच्या आरोपात तथ्य नसून त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणे संयुक्तीक नाही, असेही म्हटले होते. त्यानंतर जळगाव येथे संध्याकाळी जि.प. अध्यक्ष निवडीसंदर्भात भाजपाची बैठक झाली. या निमित्ताने खडसे व महाजन एकत्र आले भाजपा कार्यालयात ते दोघेही शेजारी-शेजारी बसले होते. 

फडणवीस व महाजन यांच्यासह पक्षातील इतरांबद्दलच्या नाराजीबद्दलही बोलणे टाळत खडसे यांनी सध्या केवळ जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवर लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सध्या साडेसाती असल्याच्या चर्चेवरून महाजन व खडसे चांगलेच हास्यविनोदात रमले. त्यांनी एकमेकांना टाळीही दिली. तसेच एकनाथ खडसे यांनी तिकीट कापल्याचा आरोप केला नव्हता, तर त्यांची केवळ नाराजी होती. त्यांच्याशी बोललो असून त्यांची नाराजीही दूर केली आहे, असा दावा गिरीश महाजन यांनी केला. आमची मने कधी दुरावली नव्हती, त्यामुळे मनोमिलनाचा प्रश्नच येत नाही, असेही महाजन यांनी सांगितले होतो. आम्ही नेहमीच सोबत असतो असेही सांगायला दोघे विसरले नाही. 

महत्त्वाच्या बातम्या 

शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?

नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही भाजपचीच सत्ता येणार; अमित शाह यांचा दावा

सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

 

Web Title: Bjp devendra fadnavis and eknath khadse meeting in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.