‘डीपीडीसी’ निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व सिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 05:00 PM2017-09-08T17:00:47+5:302017-09-08T17:03:11+5:30
९ पैकी ५ जागांवर भाजपा उमेदवार विजयी: ३ जागी राष्टÑवादी तर शिवसेनेच्या वाट्याला केवळ १ जागा
Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली मतमोजणीशिवसेनेला केवळ ग्रामीणची १ जागातीन तासात आटोपली मतमोजणी
ल कमत न्यूज नेटवर्कजळगाव, दि.८- जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) ९ जागांसाठी गुरूवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. या ९ पैकी ५ जागा जिंकत भाजपाने वर्चस्व सिद्ध केले. तर ३ जागी राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला केवळ ग्रामीण मतदार संघातील नागरिकांचा मागासप्रवर्ग गटातील एक जागा जिंकता आली.सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. टेबल क्र.१ वर ग्रामीणच्या नामाप्र गटातील २ जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली. तर टेबल क्र.२ वर लहान नागरी गटातील नामाप्र च्या १ जागेसाठीची तर टेबल क्र.३ वर लहान नागरी गटातील नामाप्र महिला १ जागेसाठीची मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीला मतपत्रिकांचे उमेदवाराच्या पसंतीक्रमानुसार विभाजन करून नंतर मतमोजणी करण्यात आली. ग्रामीण मतदार संघासाठी एकूण मतदार ६७ तर लहान नागरी गटासाठी एकूण मतदार ३९१ होते. मात्र त्यापैकी अनुक्रमे ९५.५२ टक्के व ९०.२८ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण मतदार संघग्रामीण मतदार संघात नामाप्र गटात २ जागांसाठी शिवसेनेचे गोपाल घनश्याम चौधरी, पिंप्री ता.धरणगाव, राष्टÑवादीकाँग्रेसचे भूषण काशिनाथ पाटील,सायगाव ता.चाळीसगाव व राष्ट्रवादीचेच हिंमत वामन पाटील हे रिंगणात होते. त्यात गोपाल चौधरी यांना २७, भूषण पाटील यांना २९ तर हिंमत पाटील यांना १३ मते मिळाली. गोपाल चौधरी व भूषण पाटील हे पहिल्याच फेरीत विजयी झाले. एकूण ६४ मतदान झाले होते. त्यापैकी ५ मते बाद ठरली. तर ५९ वैध ठरली.लहान नागरी मतदार संघ नामाप्र गटलहान नागरी मतदार संघातील नामाप्र गटाच्या एकाजागेसाठी प्रविण (वासुदेव) रघुनाथ चौधरी, भाजपाचे राजेंद्र रामदास चौधरी,चाळीसगाव व राष्टÑवादीचे राजेश गजानन वानखेडे, सावदा हे तिघे उमेदवार रिंगणात होते. त्यात राजेश वानखेडे हे १९० मते मिळवून विजयी झाले. राजेंद्र चौधरी यांना ६३ तर प्रवीण चौधरी यांना ३५ मते मिळाली. एकूण ३५२ मतदान झाले होते. त्यापैकी ५८ मते बाद ठरली. तर २९४ मते वैध ठरली. इन्फो-एरंडोलच्या जयश्री पाटील एका मताने विजयीलहान नागरी मतदार संघातील नामाप्र महिला गटाच्या एका जागेसाठी शिवसेनेच्या विजया प्रकाश पवार, चाळीसगाव, भाजपाच्या जयश्री नरेंद्र पाटील, एरंडोल व शिवसेनेच्या कल्पना विलास महाजन,धरणगाव असे तीन उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी जयश्री पाटील यांना १३८,विजया पवार यांना १३७ तर कल्पना महाजन यांना २९ मते मिळाली. त्यात जयश्री पाटील या अवघ्या एका मताच्या फरकाने विजयी झाल्या. एकूण ३५२ मतदान झाले होते. पैकी ४८ मते बाद ठरली. तर ३०४ मते वैध ठरली.लहान नागरी मतदार संघ सर्वसाधारण गटात झाली चुरशीची लढतलहान नागरी मतदार संघातील सर्वसाधारण गटाच्या २ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यात सुनील रमेश काळे, वरणगाव, राजेंद्र रामदास चौधरी,चाळीसगाव, यशवंत वासुदेव दलाल, भालचंद्र रामभाऊ जाधव,धरणगाव, पुष्पलता साहेबराव पाटील,अमळनेर, मनोज भाऊराव पाटील,अमळनेर, मुकेश नरेंद्र पाटील,भुसावळ, विनय (पप्पू) शशिकांत भावे, धरणगाव, मंगेश सुधाकर तांबे,पारोळा, महेंद्र एकनाथ धनगर,चोपडा, अमोल पंडितराव शिंदे,पाचोरा, मिलिंद शंकर वाघुळदे फैजपूर,ता.यावल यांचा समावेश होता. त्यात भाजपाचे सुनील रमेश काळे पहिल्याच फेरीत व भाजपाचेच राजेंद्र रामदास चौधरी हे दहाव्या फेरीत विजयी झाले. एकूण ३५३ मतदान झाले होते. त्यापैकी ७३ मते बाद ठरली. तर २८० मते वैध ठरली. लहान नागरी मतदार संघ सर्वसाधारण महिलालहान नागरी मतदार संघातील सर्वसाधारण महिला गटाच्या ३ जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. त्यात विजया कुशल जावळे, सावदा ता.रावेर, पुष्पलता साहेबराव पाटील,अमळनेर, कल्पना दशरथ महाजन,एरंडोल, सोनल रमाकांत महाजन,भुसावळ, वर्षा राजेंद्र शिंदे एरंडोल यांचा समावेश होता. सोनल महाजन या पहिल्या फेरीत पहिल्या क्रमांकाने तर वर्षा शिंदे पहिल्याच फेरीत दुसºया क्रमांकाने विजयी झाल्या. तर पुष्पलता पाटील चौथ्या फेरीत विजयी झाल्या. एकूण ३५३ मतदान झाले होते. त्यापैकी ५७ अवैध ठरले तर २९६ मते वैध ठरली. ----- इन्फो- विजयी उमेदवारग्रामीण मतदार संघगोपाल घनश्याम चौधरी (नामाप्र) (शिवसेना)भूषण काशिनाथ पाटील (नामाप्र) (राष्टÑवादी) लहान नागरी मतदार संघ सुनील रमेश काळे (सर्वसाधारण) (भाजपा)राजेंद्र रामदास चौधरी (सर्वसाधारण) (भाजपा)सोनल रमाकांत महाजन (सर्वसाधारण महिला)(भाजपा) वर्षा राजेंद्र शिंदे (सर्वसाधारण महिला)(राष्टÑवादी)पुष्पलता साहेबराव पाटील (सर्वसाधारण महिला) (भाजपा)राजेश गजानन वानखेडे (नामाप्र) (राष्टÑवादी)जयश्री नरेंद्र पाटील(नामाप्र महिला) (भाजपा)