चार पंचायत समित्यांवर भाजपाचे वर्चस्व

By admin | Published: March 15, 2017 12:18 AM2017-03-15T00:18:29+5:302017-03-15T00:18:29+5:30

सभापती-उपसभापती निवड : यावलला ईश्वर चिठ्ठीने संध्या महाजन व उमाकांत पाटलांची लागली वर्णी

BJP dominates four panchayat samiti | चार पंचायत समित्यांवर भाजपाचे वर्चस्व

चार पंचायत समित्यांवर भाजपाचे वर्चस्व

Next

भुसावळ : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीतील सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भुसावळसह रावेर, मुक्ताईनगर व बोदवड येथे भाजपाच्या सदस्यांची वर्णी लागली़  यावल येथे बहुमत असूनही भाजपा सदस्याने बंडखोरी केल्याने भाजपाचे येथे सत्ता येऊ शकली नाही़ 
ईश्वरचिठ्ठीत भाजपातून निवडून आलेल्या मात्र काँग्रेसच्या सहकार्याने उमेदवारी दाखल केलेल्या संध्या महाजन यांची सभापतीपतीपदावर वर्णी लागली तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे उमाकांत पाटील यांची ईश्वरचिठ्ठीतून निवड झाली़
दरम्यान, निवडीनंतर ठिकठिकाणी पदाधिकारी व कार्यकत्र्यानी जल्लोष केला़
4भुसावळ : सभापतीपदी सुनील महाजन यांची वर्णी
पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनील श्रीधर महाजन तर उपसभापतीपदी मनीषा भालचंद्र पाटील यांची हात उंचावून झालेल्या मतदानाने निवड करण्यात आली़ निवडीनंतर भाजपा पदाधिका:यांनी जल्लोष केला़
पंचायत समिती सभागृहात मंगळवारी निवड प्रक्रिया राबविण्यात आली़ भाजपातर्फे महाजन यांनी सभापतीपदीपदासाठी तर पाटील यांनी उपसभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होत़े
सेनेतर्फे विजय भास्कर सुरवाडे यांनी सभापतीपदासाठी तर राष्ट्रवादीतर्फे आशा संतोष निसाळकर यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला़
हात उंचावून मतदान
निवडीसाठी हात  उंचावून मतदान करण्यात आल़े सेनेच्या सुरवाडे यांना त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या निसाळकर यांनी मतदान केले तर भाजपाच्या महाजन यांना त्यांच्यासह प्रीती पाटील, मनीषा पाटील व वंदना उन्हाळे यांनी मतदान केल्याने त्यांची सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली़
उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या निसाळकर यांना स्वत:स ह सेनेच्या सुरवाडे यांचे एक मत मिळाले तर मनीषा पाटील यांना त्यांच्यासह अन्य भाजपाच्या तीन सदस्यांनी मतदान केल्याने त्यांची उपसभापती निवड करण्यात आली
निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर होत़े त्यांना गटविकास अधिकारी एस़बी़ मावळे यांनी सहकार्य केल़े
गुलालाची उधळण अन् जल्लोष
भाजपाच्या ताब्यात आलेल्या पंचायत समितीत दोन्ही जागांवर भाजपाचे सदस्य निवडल्यानंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकत्र्यानी गुलालाची व रंगाची उधळण करून जल्लोष केला़
प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा़सुनील नेवे, किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, माजी उपसभापती मुरलीधर पाटील, जि़प़चे माजी सदस्य समाधान पवार, पिंटू ठाकूर, प्रमोद सावकारे, नारायण कोळी, उल्हास बोरोले, बंटी सोनवणे, ज्ञानदेव झोपे, प्रमोद वारके, किरण चोपडे, मनोज कोल्हे, दिनेश नेमाडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे,  चुडामण भोळे, जि़प़चे माजी सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी आदींची उपस्थिती होती़
4मुक्ताईनगरात : भाजपाचा जल्लोष
सभापती-उपसभापती निवडीनंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकत्र्यानी जल्लोष केला़  प्रसंगी जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे, योगेश कोलते, रमेश ढोले, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस सतीश चौधरी, संदीप देशमुख, डॉ.बी.सी.महाजन, जि.प. माजी अध्यक्ष पुरणमल चौधरी, रामभाऊ पाटील, कमल किशोर गोयंका, लक्ष्मण भालेराव, विनोद सोनवणे, चंद्रकांत भोलाणे, प्रदीप साळुंखे, बबलू कोळी, विलास धायडे, ललित महाजन यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
4रावेर : सभापतीपदी माधुरी नेमाडे
पंचायत समितीच्या सभापती पदासाठी  चिनावल गणातून भाजपतर्फे निवडून आलेल्या माधुरी गोपाळ नेमाडे यांची बिनविरोध निवड झाली. मस्कावद गणातून भाजपतर्फे निवडून आलेल्या अनिता महेश चौधरी यांचीही उपसभापतीपदासाठी बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर कार्यकर्ते व पदाधिका:यांनी जल्लोष केला़
निवडणूक अधिकारी तथा फैजपूर प्रांताधिकारी मनोज घोडेपाटील होत़े  निवड घोषित करताच फटाक्यांच्या आतषबाजीत व गुलालाची उधळण करत भाजप कार्यकत्र्यानी जल्लोष व्यक्त केला.
दरम्यान, मंगळवारी दुपारी तीन वाजता या सभेस प्रारंभ झाला. छाननी व माघारीअंती सभापतीपदासाठी माधुरी नेमाडे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र तर उपसभापती पदासाठी अनिता महेश चौधरी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून त्यांची बिनविरोध निवड  झाल्याचे अध्याशी अधिकारी यांनी जाहीर केले.
नवनिर्वाचित पं.स.सदस्य पी.के.महाजन, जितेंद्र पाटील, धनश्री सावळे, जुम्मा तडवी, दीपक पाटील, कविता कोळी, योगेश पाटील, योगीता वानखेडे, प्रतिभा बोरोले, रूपाली कोळी यांच्यासह भाजपचे नवनिर्वाचित जि.प.सदस्या रंजना पाटील, नंदा पाटील, नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे हे या वेळी आवजरून उपस्थित होते.
प्रांती मनोज घोडेपाटील व गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी नवनिर्वाचित सभापती नेमाडे व उपसभापती चौधरी यांचा सत्कार केला. तहसीलदार विजयकुमार ढगे यांचे निवडणूक कामी सहकार्य लाभले.
दरम्यान, जि.प.सभापती सुरेश धनके, जिल्हा बँक संचालक नंदकिशोर महाजन, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ.मिलिंद वायकोळे, कृउबा सभापती डॉ.राजेंद्र पाटील, जि.प.सदस्या कोकीळा पाटील, माजी सभापती अलका चौधरी, माजी पं.स.सदस्य महेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, कृउबा संचालक गोपाळ नेमाडे, श्रीकांत महाजन, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा नेहा गाजरे, तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे, शिवाजीराव पाटील आदींनी सभापती-उपसभापतींचा सत्कार केला.
बोदवड : पंचायत समितीच्या सभापतीपती गणेश पाटील तर उपसभापतीपदी दीपाली राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
बोदवड पंचायत समितीच्या चारही गणात भाजपचे सदस्य निवडून आल्याने सभापतीपद भाजपाकडे जाईल हे निश्चित होत़े
मंगळवार, 14 रोजी बोदवड पंचायत समितीच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी ए.डी. बावस्कर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली़ सभापतीपदासाठी गणेश पाटील तर उपसभापतीपदासाठी दीपाली राणे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता निवडणूक अधिकारी थोरात यांनी सभापती व उपसभापतीपदाची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.
निवडीनंतर भाजप कार्यकत्र्यानी जल्लोष केला. त्यावेळेस भाजप जिल्हा सरचिटणीस कैलास चौधरी, तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, रामदास पाटील, दूध संघ संचलक मधुकर राणे, अनिल पाटील, ब्रिजलाल जैन, दिलीप घुले, दीपक वाणी, किरण वंजारी, मावळत्या सभापती मुक्ताबाई पाटील, रवींद्र जवरे, जि.प.सदस्य भानुदास गुरचळ आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगर : पंचायत समितीवर पुन्हा भाजपाची सत्ता कायम असून सभापतीपदी शुभांगी चंद्रकांत भोलाणे तर उपसभापतीपदी प्रल्हाद हरी जंगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
आठपैकी सहा सदस्य भाजपाचे निवडून आल्याने या पं.स.मध्ये भाजपाने पुन्हा एक हाती सत्ता राखली आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव सभापती पदावर उचंदा पं.स.गणातून निवडून आलेल्या शुभांगी चंद्रकांत भोलाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी जि.प.चे माजी सदस्य तथा चांगदेव पं.स.गणातून निवडून आलेले प्रल्हाद हरी जंगले यांचीदेखील बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही जागेकरिता प्रत्येकी एक अर्ज असल्याने बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी जाहीर केले. प्रसंगी नवनिर्वाचित पं.स.सदस्य विकास समाधान पाटील, राजेंद्र सुपडा सावळे, सुवर्णा प्रदीप साळुंके, विद्या विनोद पाटील, सुनीता किशोर चौधरी आदी उपस्थित होते.
जि.प.सदस्य वैशाली तायडे, नीलेश पाटील, वनिता गवळे, जयपाल बोदडे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
माजी सभापतींची नेमप्लेट कार्यकत्र्यानी फेकली
4भुसावळ पंचायत समिती निवडणुकीत तिकीट कापल्याच्या रागातून आमदार संजय सावकारे यांची प्रतिमा हटवणा:या माजी सभापती राजेंद्र चौधरी यांच्याविषयी भाजपा कार्यकत्र्यानी निवडीनंतर रोष दर्शवत त्यांच्या दालनातील नेमप्लेट अक्षरश: काढून फेकली़
भुसावळात विभागून पदांवर संधी
4भुसावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनील महाजन तर उपसभापतीपदी मनीषा पाटील यांची वर्णी लागली आह़े पदाधिकारी निवडीचे अधिकार पक्षाने आमदारांना कोअर कमेटीच्या बैठकीत दिले होत़े सूत्रांच्या माहितीनुसार प्रत्येक सदस्याला प्रत्येकी सव्वावर्ष सभापती पदाची संधी मिळणार आह़े चार सदस्य भाजपाचे आहेत़
राजीनामा न दिल्याने मतदान करण्याबाबत आक्षेप
4भुसावळ पंचायत समिती सदस्य प्रीती मुकेश पाटील या खडका ग्रामपंचायतीच्या सरपंच असताना त्यांनी एका पदाचा राजीनामा गरजेचे आहे मात्र त्यांनी तो न दिल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये, असा आक्षेप पं़स़सदस्य विजय सुरवाडे यांनी नोंदवला़ प्रांत श्रीकुमार चिंचकर म्हणाले की, चौकशी करण्यात आली त्यात पाटील यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाल़े

Web Title: BJP dominates four panchayat samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.