“नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब एकदमच फुसका निघाला”; गिरीश महाजनांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 11:07 AM2021-11-12T11:07:12+5:302021-11-12T11:08:01+5:30

राजकीय विरोध म्हणून त्यांनी आरोप करण्यापेक्षा सबळ पुरावे द्यायला हवेत, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

bjp girish mahajan criticised nawab malik over devendra fadnavis allegation | “नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब एकदमच फुसका निघाला”; गिरीश महाजनांचा खोचक टोला

“नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब एकदमच फुसका निघाला”; गिरीश महाजनांचा खोचक टोला

Next

जळगाव: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक अनेक खळबळजनक आरोप आणि दावे करताना दिसत आहेत. सुरुवातीला समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मलिकांनी भाजपचे विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी नवाब मलिक यांना खोचक टोला लगावला आहे. नवाब मलिक यांचा हायड्रोजन बॉम्ब फुसका निघाला, असे महाजन यांनी म्हटले आहे. 

गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये बोलताना नवाब मलिक यांच्यावर टीका केली. गिरीश महाजन यांनी आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी बिनबुडाचे आरोप करीत लक्ष विचलित करण्याचा प्रयत्नं करत आहेत, असे गिरिश महाजन यांनी म्हटले आहे. 

शिवसेनेमध्ये जनतेचे प्रश्न सुटत नाहीत

नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब एकदमच फुसका निघाला. राजकीय विरोध म्हणून त्यांनी आरोप करण्यापेक्षा सबळ पुरावे द्यायला हवेत, असे सांगत शिवसेनेमध्ये जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने त्यांचे कार्यकर्ते राज्यात आमची सत्ता नसताना ही भाजपमध्ये आले आहेत. चोपडा तालुक्यात भाजपचा आमदार नसला तरी चोपडा तालुका हा भाजपचा नेहमीच बालेकिल्ला राहिला असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. 

शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

चोपडा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रवादी लक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये चलबिचल निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. यातूनच सबळ नेतृत्व अभावी चोपडा तालुक्यातील दोनशे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी जाहीर माफी मागून ४८ तासांत हे ट्विट डिलिट करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा असा इशारा दिला आहे.
 

Web Title: bjp girish mahajan criticised nawab malik over devendra fadnavis allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.