भाजप शासन सत्तेला लागलेली बोंडअळी : संग्राम कोते-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 06:50 PM2018-09-03T18:50:59+5:302018-09-03T18:54:56+5:30
राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.
जामनेर : राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सोमवारी दुपारी येथे केले.
जामनेर येथील मंगल कार्यालयात झालेल्या युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील होते. संग्राम पाटील यांनी सांगितले की, राज्यात सर्वत्र सत्तेचा दुरुपयोग होत आहे. तालुक्यात त्याचे प्रमाण जास्तच आहे. बुथकमेटी हा सत्ता प्राप्तीचा राजमार्ग असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांनी सांगितले की, मंत्री गिरीष महाजनांनी चार वर्षात तालुक्यात एकही नवीन सिंचन प्रकल्प आणला नाही. जिल्हा युवक अध्यक्ष ललित बागुल, अॅड. रवींद्र पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी युवक तालुकाध्यक्षपदी शैलेश पाटील, शहर अध्यक्षपदी कृष्णा माळी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. व्यासपीठावर भगवान पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, डिगंबर पाटील, युनुस खान, जावेद मुल्लाजी, प्रमोद पाटील, नाना पाटील, अभिषेक पाटील, कल्पिता पाटील, पप्पु पाटील, पुजा भडांगे, बंगालसिंग चितोडीया, अनिस पठाण, प्रल्हाद बोरसे, मनीषा पाटील, मिना शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचलन किशोर पाटील यांनी तर आभार सुनिल पाटील यांनी मानले.