भाजप नेते घनश्याम अग्रवाल यांच्याकडून नाभिक समाजातील २५ कुटुंंबाना एक महिन्याचा किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 08:33 PM2020-04-08T20:33:21+5:302020-04-08T20:35:12+5:30
चोपडा शहरातील एकूण २५ कुटुंबाना एका महिन्याचे किराणा साहित्य भरून दिले आहे.
चोपडा, जि.जळगाव : भाजपचे माजी केंद्रीय समितीचे सदस्य व स्थानिक नेते घनश्याम अग्रवाल यांनी बुधवारी पुन्हा चोपडा शहरातील ज्या नाभिक समजावर खरोखर उपासमारीची वेळ आली आहे, ज्या कुटुंबातील लोक दररोजच्या कामावर अवलंबून आहेत मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत आपला रोजगार बुडाला आहे अशा चोपडा शहरातील एकूण २५ कुटुंबाना एका महिन्याचे किराणा साहित्य भरून दिले आहे.
घनश्याम अग्रवाल व मित्र मंडळाकडून शहरात दररोज सायंकाळी ३०० लोकांना खिचडी वाटप, पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीत प्रत्येकी ५० हजारांची मदत व २५ नाभिक समाजाच्या कुटुंंबाना किराणा मदत व तालुक्यातील वडगाव बुद्रूक गावातील १५ कुटुंंबाना प्रत्येकी एक लीटर खाद्यतेल पुरवले आहे.
नाभिक समाजाच्या ज्या परिवाराना मदत केली त्या परिवाराना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. या साहित्य वाटपकामी नाभिक समाजाचे अध्यक्ष मनोहर सोनगिरे, उमाकांत निकम, सोपान बाविस्कर, बापू पवार, विनोद निकम, राजू निकम, राजू ऐशी, भारत सेंदाणे, राहुल निकम, बाळा निकम यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
या समाज बांधवांनीच घनश्याम अग्रवाल यांची मदत त्यांना घरपोहोच दिली आहे.