सत्तेत असूनही भाजपाचे नेते अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:34 AM2019-08-04T00:34:05+5:302019-08-04T13:03:19+5:30

विश्लेषण

BJP leaders fail despite being in power | सत्तेत असूनही भाजपाचे नेते अपयशी

सत्तेत असूनही भाजपाचे नेते अपयशी

Next

सचिन देव
जळगाव : गेल्या पाच वर्षांपासून भाजपाची गल्ली ते दिल्ली सत्ता असून यंदाही पुन्हा केंद्रात भाजपाचेच सरकार विराजमान झाले आहे. असे असतानांही महिनाभरापासून ट्रू जेटला ईसीजी परवानगी मिळत नसल्याने, जिल्ह्यातील सत्तेत असलेले नेते, अपयशी असल्याचे दिसून येत आहे.
ुउड्डाण योजने अंतर्गंत एअर डेक्कनने सुरु केलेली विमानसेवा वर्षभरातच बंद पडली. त्यानंतर वर्षभरानंतर हैदराबाद येथील ट्रू जेट या कंपनीने सेवा सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. १७ जुलैचा कंपनीने मुहूर्तदेखील निश्चित केला होता. मात्र, ईजीसीची (केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय) याची ट्रू जेटला तिकीट विक्रीसाठी परवानगी न मिळाल्यामुळे ही सेवा रखडली आहे. दुसरे म्हणजे अहमदाबाद विमानतळावरही ह्यस्लॉट ह्णमिळालेला नाही. ही सेवा सुरु होण्यासाठी कंपनीतर्फे गेल्या महिना भरापासून ईजीसीकडे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे.
ट्रू जेटला तिकीट विक्रीची परवानगी मिळण्यासाठी गेल्या आठवड्यात खासदार उन्मेश पाटील यांनीदेखील संसदेच्या आधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. मात्र, आठवडा उलटुनही उन्मेश पाटील यांच्या लक्षवेधीला केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने मनावर घेतलेले दिसून आले नाही. विशेष म्हणजे उड्डाण योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजने अंतर्गंत नाशिक, नांदेड व कोल्हापुरची विमानसेवा सुरु झाली असून, फक्त जळगावचीच विमानसेवा रखडली आहे.
या सेवेसंदर्भात तात्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील जळगावची विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगत आहेत. गेल्याच महिन्यात गिरीश महाजन यांनी जळगाव विमानतळाची पाहणी करुन, लवकरच सेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महिना उलटुनही भाजपाच्या नेत्यांना ईजीसीकडून ट्रू जेटला तिकीट विक्रीसाठी परवानगी मिळण्याबाबत विलंब होत आहे. भाजपाच्या नेत्यांनाच ईजीसीची परवानगी मिळत नसेल, तर ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कशी मिळणार?विमानसेवा पुन्हा सेवा झाल्यावर जळगावला दळवळणची मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे रोजगाराच्या संधी उलब्ध होणार आहे. याची जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना जाण आहे. मग, ईजीसीकडून परवानगी मिळण्यासाठी संसदेत लक्षवेधी मांडूनही, त्यांना उपयश का येत आहे..जर सत्तेत असुनही, सेवा सुरु करण्यासाठी विलंब लागत असेल तर, भाजपाचे नेते सत्तेत असुनही, अपयशी आहेत..असे प्रश्न जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

Web Title: BJP leaders fail despite being in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव