शिवजयंतीवरुन भाजप-मनसेत वाक्युध्द
By admin | Published: February 21, 2017 12:29 AM2017-02-21T00:29:32+5:302017-02-21T00:29:32+5:30
अनंत जोशी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप : भाजपा महिला आघाडीची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
जळगाव : शिवजयंतीवरुन भाजप व मनसे या दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यामध्ये वाक्युध्द सुरु झालेले आहे. मनसेचे नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी काव्यर}ावली चौकात पथनाटय़ सुरु असताना महिलांशी अरेरावी करुन शिवीगाळ केली तसेच महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले असा आरोप भाजपा महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर अनंत जोशी यांनी पत्रकार परिषद घेवून या आरोपाचे खंडन केले आहे. विविध आंदोलनात मी सहभागी आहे तसेच मनपा सभागृहातही अनेकांच्या फायद्यात मी अडथळा ठरल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी माङयावर खोटे आरोप करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना जयश्री पाटील, शोभा कुलकणी, जयश्री नागराज पाटील, ममता जोशी, ज्योती पालीवाल, रेखा पाटील, छाया पाटील, रेखा पाटील, ज्योती राजपूत, वंदना पाटील, ज्योती निंभोरे, स्नेहा निंभोरे उपस्थित होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मी अवमान केला असा माङयावर आरोप करणे हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे नगरसेवक अनंत जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, काव्यर}ावली चौकात पथनाटय़ाचा कार्यक्रम सुरू असताना आपण तेथे गेलो. तेथील कलावंतांना फक्त एवढेच बोललो की, समांतर रस्त्याअभावी तुमच्या वयाचे तरूण अपघातात मरण पावत आहेत. ते थांबावेत यासाठी आम्ही सुरु केलेल्या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा, असे केल्यास शिवाजी महाराजांना मनापासून आनंद होईल. आपण पथनाटय़ाचा कार्यक्रम छान करीत आहात. यावेळी काही भाजपा कार्यकत्र्यानी मला येथून ताबडतोब चालते व्हा, तुम्हाला आम्ही बोलावलेले नाही असे वक्तव्य केले. या ठिकाणी आपण महिलांशी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही किंवा वर्तन केले नाही. तसेच छत्रपतींचाही अवमान होईल असे काहीही बोललो नाही. शिवाजी महाराज हे तर आपले आदर्श आहेत.मला बदनाम करण्यासाठी माङयावर खोटे आरोप करण्यात येत आहे.
जयश्री पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिव जयंती निमित्त काव्यर}वाली चौकात महाराजांची प्रतिमा पूजन आणि शासकिय पॉलीटेकAीकच्या विद्याथ्र्यांचे शिव चरित्रावर पथनाटय आयोजित केले होते. अनंत जोशी यांनी मद्याच्या नशेत तेथे येवून भाजपाला शिव्या द्या व त्यांचे पथनाटय़ करा, असे म्हणत महापुरुषांचा अवमान करीत सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान गोंधळ घातला.
यावेळी काही मुलींच्या दुचाकींच्या चाव्या काढून घेतल्या. यावेळी महानगराध्यक्षा जयश्री पाटील, मंडळ अध्यक्षा जयश्री नागराज पाटील, जिल्हा चिटणीस वंदना पाटील,नम्रता जोशी यांनी त्यास विरोध केला. या प्रकाराबाबत पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून निवेदन सादर केले. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी निवेदन देताना महिलांतर्फे करण्यात आली आहे.