महागौरव पर्वानिमित्त अमळनेरात भाजपाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:00 AM2018-08-27T00:00:56+5:302018-08-27T00:01:45+5:30
आगामी निवडणुकीची आखताहेत रणनीती
अमळनेर, जि.जळगाव : भारतीय जनता पार्टीच्या महागौरव पर्वानिमित्त अमळनेर कुउबा समितीत ग्रामीण व शहर भाजपाची बैठक जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील व आमदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत पार्टीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रणशिंग फुंकले व पुढील रणनीतीची आखण्यात आली.
प्रारंभी शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उदय वाघ, खासदार पाटील व आमदार वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना, भाजपा आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरस व मजबूत झाली असली तरी आता आगामी निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटनेवर खरी जबाबदारी असून शहर व तालुका मंडलासह प्रत्येक बूथने सज्ज व्हावे, कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुकीत शत प्रतिशत यश मिळविणे हे पार्टीचे ध्येय असून, कार्यकर्त्यांनी तळमळीने कामाला लागावे, असे आवाहन नेत्यांनी केले.
या वेळी पं.स.सभापती वजा भिल, जि.प.चे माजी सदस्य विनायक बिरारी, जिल्हा चिटणीस महेशराव पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जि.प.चे माजी सदस्य अॅड.व्ही.आर. पाटील, कामराज पाटील, जि.प.सदस्या संगीता भिल, सोनूबाई भिल, पं.स.सदस्य भिकेश पाटील, रेखा नाटेश्वर पाटील, जि.प.चे माजी सदस्य संदीप पाटील, मार्केट संचालक प्रफुल पवार, शरद सोनवणे, नगरसेविका नूतन महेश पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस जिजाब पाटील, हिरालाल पाटील, सरचिटणीस दिलीप ठाकूर, उमेश वाल्हे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुरेखा पाटील, शहराध्यक्ष पुष्पाबाई राजपूत, युवामोर्चा अध्यक्ष योगिराज चव्हाण यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन हिरालाल पाटील यांनी केले.