चाळीसगाव येथे भाजप पदाधिकाऱ्यांची २२ रोजी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:54 PM2019-12-20T22:54:12+5:302019-12-20T22:54:30+5:30
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
भाजप तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक
२२ रोजी होणार निवडणूक
चाळीसगाव, जि.जळगाव : भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २२ रोजी भूषण मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता तालुकाध्यक्ष पदाची तर दुपारी चार वाजता शहराध्यक्ष पदाची निवड होईल.
तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांनी तयारी करून कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत.
तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी भाजप जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील तर शहराध्यक्ष पदासाठी मधुकर काटे हे असणार आहेत.
तालुकाध्यक्ष पदासाठी २००४ ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल चार टर्म पासून के.बी.साळुंके हे कार्यरत असून तालुक्यात पहिल्यांदाच त्यांना संधी मिळाली आहे. तालुकाध्यक्ष पदासाठी अनिल नागरे, रोहिणी सुनील निकम, कपिल पाटील बहाल कसबे, दिनेश बोरसे बहाल रथाचे, रवींद्र चुडामण पाटील, धनंजय मांडोळे खडकी, किसनराव जोर्वेकर टाकळी प्र.चा., रत्नाकर पाटील ब्राम्हणशेवगे, संजय पाटील पातोंडा, रमेश सोनवणे, डॉ.महेश राठोड सांगवी, राजेंद्र पाटील मजरे आदींचा तर शहराध्यक्ष पदासाठी घृष्णेश्वर पाटील, विवेक चौधरी, राजेंद्र पगार, प्रभाकर चौधरी, अमोल नानकर, सोमसिंग पाटील, अॅड.प्रशांत पालवे आदींचा समावेश आहे.
पक्षाच्या घटनेनुसार मला यावेळी उमेदवारी करता येत नाही. माझ्या कारकीर्दीत संघटनेत स्वराज्य संस्था, खासदार, आमदार यासह अनेक निवडणुकीत पक्षाला यश मिळाले आहे. यापुढे पक्ष भविष्यात जे काम देईल ती जबाबदारी पार पाडू.
- के.बी.साळुंखे तालुकाध्यक्ष, भाजप, चाळीसगाव