भाजपाची संसदीय समिती घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 12:20 AM2017-01-21T00:20:45+5:302017-01-21T00:20:45+5:30
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संसदीय समिती घोषित केली आहे.
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संसदीय समिती घोषित केली आहे. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह 14 जणांचा समितीत समावेश आहे.
जि.प. व पं.स.सार्वत्रिक निवडणूक समितीमध्ये जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प्रदेश सरचिटणीस व आमदार स्मिता वाघ, खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जि.प. अध्यक्षा प्रयाग कोळी, जि.प.गटनेते हर्षल पाटील, महिला आघाडीच्या शैलजा पाटील, अनुसूचित जातीचे विकास अवसरमल, अनुसूचित जमातीचे नितीन कोळी यांचा समावेश आहे. या समितीत पदसिद्ध पदाधिकारी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विभाग संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर यांचा समावेश आहे.
लोकप्रतिनिधींकडे तालुक्याची जबाबदारी
निवडणुकीसाठी आमदार व खासदार यांच्याकडे तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्यासोबत पालक पदाधिकारी नियुक्त केले आहे. भुसावळ : आमदार संजय सावकारे, प्रा.सुनील नेवे, रावेर व यावल : आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश धनके, अॅड.रोहिणी खडसे, हर्षल पाटील, बोदवड व मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे, प्रा.सुनील नेवे, निवृत्ती पाटील, जामनेर : जलसंपदामंत्री गिरीश महाजन,तुकाराम निकम, गोविंद अग्रवाल, जळगाव : आमदार सुरेश भोळे, प्रभाकर पवार, पारोळा व एरंडोल : खासदार ए.टी.पाटील, सुरेंद्र बोहरा, महेश पाटील, एस.आर.पाटील, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव : आमदार उन्मेष पाटील, सदाशिव पाटील, डॉ.संजीव पाटील, पोपटतात्या भोळे, धरणगाव, अमळनेर : आमदार स्मिता वाघ, पी.सी.पाटील, अॅड.व्ही.आर.पाटील, चोपडा : खासदार रक्षा खडसे, प्रदीप पाटील यांचा समावेश आहे.