भुसावळात वीज बिल माफीसाठी भाजपतर्फे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 16:09 IST2021-02-16T16:08:49+5:302021-02-16T16:09:08+5:30
भुसावळात वीज बिल माफीसाठी भाजपतर्फे मोर्चा काढण्यात आला.

भुसावळात वीज बिल माफीसाठी भाजपतर्फे मोर्चा
भुसावळ : वीज बिल माफी मिळण्यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळात भाजपच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येवून निवेदन देण्यात आले.
निवेदनात आघाडी सरकारने लॉकडाऊन काळातील अव्वाच्या सव्वा बिल पाठवून सामान्या वीज ग्राहकांची फसवणुक केली आहे. महावितरणने ७५ लाख विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावून ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या महावितरणाला निवेदनाद्वारे निर्वाणीचा इशारा देण्यात आहे. आघाडी सरकारने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देतेवेळी आमदार संजय सावकारे यांच्यासह उपनगराध्यक्ष रमेश नागराणी, शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, भाजप जिल्हाचिटणीस राजेंद्र पुंडलिक चौधरी, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, मनोज बियाणी, शैलेजा पाटील, अमोल महाजन, दिलीप कोळी, प्रवीण इखनकर, अनिल शर्मा, विशाल जंगले, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, पुंडलिक पाटील, राजेंद्र चौधरी, शंकर शेळके, अॅड. प्रकाश बी. पाटील, सागर जाधव, अर्जुन खरारे, नरेंद्र बऱ्हाटे, नंदकिशोर बडगुजर, सुरेश शर्मा, चंद्रशेखर पाटील, शिशीर जावळे, बिसन गोहर, संदीप सुरवाडे, चेतन बोरोले, वासुदेव बोंडे, अनिल महाजन, संंजय पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.