भाजप-शिवसेनेने माघार घेतली, म्हणून ऋतुजा लटकेंचा विजय झाला- गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 08:10 PM2022-11-06T20:10:36+5:302022-11-06T20:56:03+5:30
अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटकेंचा विजय.
प्रशांत भदाणे
जळगाव: अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवार पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण 66,530 मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे विविध विकासकामांचे उदघाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर गुलाबराव माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ज्या दिवशी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली होती, त्याच दिवशी लटकेंचा विजय निश्चित झाला होता, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी ऋतुजा रमेश लटके यांच्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली.
सर्व पक्षांनी ऋतुजा लटके यांना पाठींबा दिला होता, त्यामुळे साहजिकच त्यांचा विजय निश्चित होता, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. त्याठिकाणी काही मतं नोटालाही पडली, असं सांगत त्यांनी ठाकरे गटाला टोलाही लगावला