भाजपने सपाटून मार खाल्ला; नागपूरच्या पराभवानंतर खडसेंचे फडणवीसांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:11 PM2023-02-04T13:11:33+5:302023-02-04T13:13:58+5:30

नोकरदार शिक्षक वर्ग म्हणतो पूर्वीचे पेन्शन पाहिजे. त्यावेळी, आपले फडणवीस साहेब म्हणत होते, विरोधी पक्षात दम नाही.

BJP took a beating; Eknath Khadse's challenge to Devendra Fadnavis after Nagpur's defeat election | भाजपने सपाटून मार खाल्ला; नागपूरच्या पराभवानंतर खडसेंचे फडणवीसांना चॅलेंज

भाजपने सपाटून मार खाल्ला; नागपूरच्या पराभवानंतर खडसेंचे फडणवीसांना चॅलेंज

Next

जळगाव - राज्यातील ५ विधानपरिषद मतदारसंघांपैकी भाजपला केवळ कोकणातील एक जागा जिंकता आली. त्यामुळे, भाजपच्या विजयापेक्षा पराभवाचीच जास्त चर्चा होत आहे. त्यातही, भाजप नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड असलेल्या नागपुरातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, विरोधकांकडूनही टीका होत आहे. मात्र, कालचा पराभव हा एकमेव नसून निवडणुकांमध्ये भाजपला नागपुरात मिळालेला हा सलग तिसरा पराभव आहे. आताा, या पराभवावरुन विरोधक भाजपवर शरसंधान साधत आहेत. पूर्वश्रमीचे भाजप नेते आणि सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही या पराभवावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

नोकरदार शिक्षक वर्ग म्हणतो पूर्वीचे पेन्शन पाहिजे. त्यावेळी, आपले फडणवीस साहेब म्हणत होते, विरोधी पक्षात दम नाही. आम्ही पेन्शन देऊ असं देवेंद्रजींनी निवडणुकीत सांगितलं. पण, जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणूनच, नागपूरची जागा मुद्दामून मतदारांनी पाडली, असे म्हणत खडसेंनी नागपूरच्या पराभवाला फडणवीसांना जबाबदार धरलं. तसेच, फडणवीस, गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात विशेषत: संघाच्या बलिष्ठानातील निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ल्याचेही ते म्हणाले.  

खडसेंच्या गावात खडसे सरपंच निवडून आणू शकत नाही, असं मला म्हणणाऱ्या फडणवीस यांना माझा सवाल आहे. आता, नागपूरचा आमदार तरी निवडून आणून दाखवा, असे चॅलेंजच एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

कुछ नही अभी भाजप मे 
दुसरे लोक चुनके आ रहे है, 
उनके गाव मे ...

अशी शायरी करत खडसेंनी भाजपवर निशाणा साधला. यापुढे चित्र महाविकास आघाडीचेच आहे, असे म्हणत महाविकास आघाडीला भविष्यात मोठं यश मिळणार असल्याचंही खडसेंनी म्हटलं.

पराभवावर काय म्हणाले बावनकुळे 

या पराभवावर बोलताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की, शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी शिक्षक परिषदेने भाजपचा उमेदवार लढवावा, असा प्रस्ताव होता. मात्र, परिषदेने आधीच गाणार यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपने गाणार यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या प्रत्येक नेता व कार्यकर्त्याने परिश्रम घेतले. पण यश आले नाही याचे दु:ख आहे. या निकालावर पक्ष मंथन करेल, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: BJP took a beating; Eknath Khadse's challenge to Devendra Fadnavis after Nagpur's defeat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.