भाजप आज पाळणार काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:28+5:302021-06-24T04:13:28+5:30

जळगाव - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी लागू केलेल्या आणीबाणीमुळे नागरिकांचे अधिकारांचे हनन करण्यात ...

BJP will observe Black Day today | भाजप आज पाळणार काळा दिवस

भाजप आज पाळणार काळा दिवस

Next

जळगाव - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी लागू केलेल्या आणीबाणीमुळे नागरिकांचे अधिकारांचे हनन करण्यात आले होते. त्यामुळे भाजपकडून २५ जून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार असून, याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा जळगावतर्फे राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे हे ऑनलाईन मिटींगव्दारे सकाळी ११ वाजता मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन बैठकीला सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाकडून करण्यात आले आहे.

३४ हॉकर्सवर कारवाई

जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाकडून बुधवारी शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक या भागातील ३४ हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. तसेच फुले मार्केटमधील काही हॉकर्सचा माल देखील जप्त करण्यात आला. तसेच पिंप्राळा बाजार देखील मनपाच्या पथकाने बसू दिला नाही. मात्र, निवृत्ती नगरात काही विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे याठिकाणी नागरिकांसह विक्रेत्यांचीही गर्दी झाली होती.

आशाबाबा नगरकडे जाणारा रस्ता बंद

जळगाव - शहरातील आशाबाबा नगरकडे मारुती पार्क व शिव कॉलनीमार्गे जाणाऱ्य रस्त्यालगत रेल्वे प्रशासनाने सुरक्षा भिंतीचे काम सुरु केले आहे. यामुळे हा रस्ता पुढील दोन महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात कोसळल्या रिमझीम सरी

जळगाव - जिल्ह्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, बुधवारी दुपारी २ वाजेपासून शहर व परिसरात हलक्या व मध्यम स्वरुपात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र, अजूनही पिकांना जीवदानसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Web Title: BJP will observe Black Day today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.