जि.प.त भाजपसाठी धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:21 PM2019-11-18T12:21:21+5:302019-11-18T12:21:55+5:30
जळगाव : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास जळगाव जिल्हा परिषदेतही तसेच समीकरण असेल, अशा हालचाली सुरू असताना या हालचालींना ...
जळगाव : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास जळगाव जिल्हा परिषदेतही तसेच समीकरण असेल, अशा हालचाली सुरू असताना या हालचालींना शनिवारच्या गदारोळाने अधिकच हवा दिली आहे़ भाजपच्या या संतप्त सदस्यांनी थेट बाहेर पडण्याचे संकेतच कालच्या गोंधळानंतर उपाध्यक्षांडे बैठकीत दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावला आहेत़ १९ रोजी आरक्षण सोडत असताना हा गदारोळ भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे़
जिल्हा नियोजन कडून विविध हेडखाली आलेल्या निधीत डावलले गेल्याने भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या काही सदस्यांनी आपल्या हक्कासाठी स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ आपण २५ सदस्य बाहेर पडू अजून आपल्या हाती महिना आहे, असे संदेश भाजपच्या काही सदस्यांनी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या दालनातील बैठकीत दिले़ यामुळे मंगळवारी होणारी आरक्षण सोडतीवर बरीच समीकरणे अवलंबून राहणार आहे़
समान निधी मुद्दयावरून या आधीही सर्वसाधारण सभामध्ये मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळीही सत्ताधाऱ्यांधील हा रोष उफाळून बाहेर आला होता़ जि़ प़ सदस्या डॉ़ नीलम पाटील यांना अधिकाºयांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हा प्रकार सभागृहासमोर आणला होता़ समान निधीच्या मुद्दयावरून सदस्य आक्रमक झाले होते़ अध्यक्ष व सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दीक चकमकही झाली होती़ यावेळी विरोधात मतदानही झाले होते़ त्यानंतर स्थायीच्या सभेत वाद उफाळून आला़ ६ डिसेंबरची सभा गाजणार
६ डिसेंबर रोजी जि.प.ची सर्वसाधारण सभा होत आहे. स्थायीच्या सभेतील वादंग बघता आगामी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. आहे़ यावेळी सत्ता समिकरणे अधिक स्पष्ट होणार आहे़ ही सभा सत्ताधाºयांची अखेरची असेल, असा सूरही काही सदस्यांकडून व्यक्त होत आहे़
पंधरा ते सोळा सदस्यांमध्ये हा निधी वाटून घेतला़ अन्य सदस्यांना अंधारात ठेवले़ समान निधी वाटपाचे सभेत ठरले असताना त्यांच्याच पक्षासह विरोधी पक्षातील काही सदस्यांना निधीपासून वंचित ठेवणे योग्य नाही़ त्यांच्याच सदस्यांना अध्यक्षा विश्वासात घेत नाहीत तर हे सदस्य त्यांना मदत तरी कशी करणार त्यामुळे या अशा प्रकारातून काहीही घडू शकते. -डॉ़ निलम पाटील, सदस्या, राष्टÑवादी काँग्रेस.