भाजपाच्या वचननाम्यात ‘गटबाजी’चे प्रमाणपत्र!
By admin | Published: February 9, 2017 12:44 AM2017-02-09T00:44:23+5:302017-02-09T00:44:23+5:30
संहितेची ‘शिस्त’मोड : उन्मेष पाटील ‘गायब’, स्मिता वाघ पहिल्या तर जि.प.अध्यक्ष शेवटच्यास्थानी
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील भाजपाच्या ज्येष्ठ पदाधिका:यांनी आमदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात राग आवळल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाच्या वचननाम्याच्या मुखपृष्ठावरून त्यांचा फोटो गायब झाला आहे. ही सहज झालेली चुक आहे की जाणिवपूर्वक केलेली खेळी आहे, अशी चर्चा दिवसभर सुरु होती.
बुधवारी सकाळी भाजपा कार्यालयात ‘वचननामा’चे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.
अनवधानाने की जाणिवपूर्वक?
वचननाम्याच्या मुखपृष्ठावर जिल्ह्यातील आमदार व खासदारांना स्थान आहे. आमदार उन्मेष पाटील यांचा फोटो मात्र नाही. हा प्रकार अनवधानाने की जाणिवपूर्वक केलेली खेळी आहे, याविषयी दिवसभर चर्चा सुरु होती. गत आठवडय़ात उन्मेष पाटील यांच्या विरोधात चाळीसगावातील भाजपाच्या जुन्या कार्यकत्र्यानी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली होती.
खासदारांआधी स्मिता वाघ यांना स्थान
भाजपाच्या वचननाम्याच्या मुखपृष्ठावर दुस:या रांगेत विधान परिषदेच्या सदस्या स्मिता वाघ यांचे छायाचित्र आहे. त्यानंतर खासदार ए.टी.पाटील व रक्षा खडसे यांचा फोटो आहे. त्या पाठोपाठ अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, विधान परिषदेचे सदस्य आमदार चंदूलाल पटेल यांचे छायाचित्र आहेत.
राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या जि.प.अध्यक्ष प्रयाग कोळी यांचे तिस:या रांगेत शेवटच्या क्रमांकावर छायाचित्र आहे. माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील यांचेही छायाचित्र वचननाम्यावर नाही.
तांत्रिक चुकीमुळे पाटील यांचा फोटो राहिला. चूक लक्षात आल्यानंतर लगेचच ती दुरुस्त करण्यात आली. -उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा.