पिंप्राळ््यातील भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:36 PM2019-07-20T12:36:19+5:302019-07-20T12:36:52+5:30
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज पुरविल्याचा राग
जळगाव : पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज पुरविल्याचा राग आल्याने अक्षय उर्फ बाबू बन्सीलाल धोबी आणि विशाल भिकन कोळी (रा़ पिंप्राळा) या दोघांनी पिंप्राळ्यातील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्यावर कुºहाडीने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केटमधील पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली़ यात पाटील यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ दोघे हल्लेखोर नुकतेच जामीनावर सुटले होते.
पिंप्राळ्यातील मयूर कॉलनीतील रहिवासी कुलभूषण पाटील हे प्रभाग क्रमांक १० मधून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. त्यांनी स्वखचार्तून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पिंप्राळयातील कुंभारवाड्यातील एका महिलेच्या घरात घूसून विशाल भिकन कोळी, बाबु बन्सीलाल धोबी याच्यासह एकाने मारहाण करून त्यांच्याजवळील ७५ हजार रुपये लुटून नेले होते. हा प्रकार चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. याप्रकरणी १५ जुलै रोजी तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता़ नंतर पोलिसांनी बाबू धोबी आणि विशाल कोळी या दोघांना अटक केली होती़
नगरसेवक कुलभूषण पाटील यांनीच पोलिसांना माहिती देत सीसीटीव्ही फुटेज पुरवले असल्याचा संशया या दोघांना होता. याच रागातून पाटील यांच्यासह त्यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला चढविला़
कुºहाड हिसकावल्याने बचावले नगरसेवक
विशाल हा हातात कुºहाड घेवून कार्यालयात शिरला. इतरांनीही आत प्रवेश केला़ याचवेळी कुलभूषण पाटील यांच्या दिशेने त्याने कुºहाड उचलली, त्याचवेळी कार्यालयातील काहींनी ती कुºहाड त्यांना लागण्यापूर्वी विशालच्या हातातून हिसकावली़ या झटापटीत कुलभूषण यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली़ त्यानंतर त्याने पुन्हा बाहेर जावून लोखंडी भांडे मारण्यासाठी आणले. परंतू, त्यास अडविण्यात आले़ दरम्यान, काही वेळानंतर दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला़ हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला़
शुक्रवारीच मिळाला होता जामीन
पैसे व मोबाईल लुटीप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी विशाल कोळी व बाबु धोबी या दोघांना अटक केली होती. दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा लगेच जामीन झाला. जामीनावर सुटताच दोघांसह इतरांनी नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्लॅन आखला़ आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास कुलभूषण पाटील हे विजय पाटील, सतिश मोरे, विकास पवार व इतर तीन ते चार जणांसह सोमाणी मार्केटमधील संपर्क कार्यालयात बसलेले होते़ त्यावेळी दोघे त्यांच्या साथीदारांसह कुºहाड, तलवारसह त्याठिकाणी आले़ बाबू व विशाल याने कार्यालयाच्या दरवाजाला लाथ मारली व आत प्रवेश केला़
पोलीस ठाण्यात घेतली धाव
कार्यालयात घडलेल्या घटनेनंतर नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली व संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली़ याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, नगरसेवक मयूर कापसे, चेतन शिरसाळे, सोहम विसपुते, राहुल नेतलेकर, जितेंद्र गवळी, गजानन मालपुरे आदींची उपस्थिती होती़ कुलभूषण यांनी रात्री फिर्याद दिल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
मानराज पार्कजवळ बस-कारची समोरासमोर धडक
राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्कजवळ धुळ्याकडून जळगावकडे येणाऱ्या बसवर समोरुन भरधाव वेगात आलेली कार धडकल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारचालकाला दुखापत झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश गजानन शिरसाठ (३० रा. मोहन नगर) असे जखमीचे नाव आहे. धुळ्यावरून जळगावकडे येणारी एमएच़ २०़बीएच़ ३३६३ क्रमांकाच्या बसवर मानराज पार्कजवळ समोरुन भरधाव वेगात आलेली एमएच़ ३१़बीबी़९४०५ ही कार धडकली. कारच्या पुढील बाजूचे नुकसान होवून काच फुटल्याने चालक गणेश शिरसाठ याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या अपघातानंतर महामार्गावर काहीशी वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे चालक डी.एन.महाजन व वाहक प्रशांत मोराणकर यांनी सांगितले.