भाजपाच्या मेळाव्यातील राड्याचे सोशल मीडियावर पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:47 PM2019-04-12T12:47:03+5:302019-04-12T12:47:31+5:30

नेटकऱ्यांनी गिरीश महाजनांना केले ट्रोल

BJP's rally rally in the social media | भाजपाच्या मेळाव्यातील राड्याचे सोशल मीडियावर पडसाद

भाजपाच्या मेळाव्यातील राड्याचे सोशल मीडियावर पडसाद

Next

जळगाव : अमळनेर येथील भाजपाच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना केलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर सोशल मीडियावर पडसाद उमटत आहेत. विशेष म्हणजे हा सर्व राडा संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर झाल्यामुळे अनेकांनी महाजन यांना आपल्याच जिल्ह्यातील वाद सोडवता आले नसल्याने फटकारले आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ अमळनेर येथे बुधवारी झालेल्या भाजपच्या मेळाव्यात व्यासपीठावरच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना मारहाण केली. तसेच हाणामारी दरम्यान, गिरीश महाजन यांना देखील धक्काबुक्की झाली. त्याचे व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी सोशल मीडियावर चांगल्याच चर्चांना उधाण आले होते. अनेक नेटकऱ्यांनी महाजन यांच्यावर टिका केली तर काहींनी महाजन यांची बाजू सावरली.
नेटकºयांकडून मीम्सची बरसात
नेटकºयांनी गिरीश महाजन व भाजपाच्या पदाधिकाºयांचा या वादावरून अनेक मीम्स तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. यामध्ये महाजन यांना ट्रोल केले. तर काहींनी घटनेचा निषेध केला. काहींनी भाजपाच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ची खिल्ली उडवलेली पहायला मिळाली. अनेकांनी बी.एस.पाटील यांची बाजू घेतली तर काहींनी उदय वाघ हे कसे खरे याबाबत बाजू मांडली. तर राष्टÑवादी व कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी देखील भाजपाच्या मेळाव्यातील राड्याची चांगलीच खिल्ली उडवलेली दिसून आली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्ट
अमळनेरच्या महाभारतात राज्याचे ‘संकटमोचक’च आले संकटात...
बरे झाले गिरीश भाऊंच्या हातात बंदूक हाती लागली नाही, अन्यथा डझनभर रागा समर्थक गेलेच असतेच
बी.एस पाटील आपल्या वयाला शोभेल असे बोलले नाही आणि उदय वाघ आपल्या पदाला शोभेल असे वागले नाही.
भाजप-सेना युतीचे कार्यकर्ते अशा प्रकारे मारझोड करत असतील तर सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण खाली बसून घ्यावे, जेणेकरून मागे बसलेल्यांनाही ते पाहता येईल.
युती केली मती गेली, म्हणूनच हाणामारी झाली आणि भाऊ हे सर्व एका उन्मादाने झाले....
वाघ आले धावून ‘संकटमोचक’ गेले वाहून
भांडण संपल्यावरच नेहमी शड्डु ठोकणाराच ‘संकटमोचक’

Web Title: BJP's rally rally in the social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव