कापसाच्या बियाण्याची काळ्याबाजारात विक्री, खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:00 AM2024-05-23T10:00:12+5:302024-05-23T10:00:36+5:30
मागील खरीप हंगामातील कापसाला ६००० ते ६८०० रु. क्विंटलचा भाव अधिकतर राहिला. कमी व अस्थिर भावामुळे मागील दोन वर्षांपासून बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्रीअभावी घरातच पडून आहे.
संजय हिरे
खेडगाव, (ता. भडगाव) : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाच्या ठरावीक वाणांच्या बियाणे पाकिटांची काळ्याबाजारात सर्रास विक्री केली जात आहे. एकीकडे मागील हंगामातील कापूस पडलेल्या दरात विक्री करावा लागत आहे; तर बियाणे खरेदी मात्र बाराशेच्या दरात करावी लागत आहे; यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मागील खरीप हंगामातील कापसाला ६००० ते ६८०० रु. क्विंटलचा भाव अधिकतर राहिला. कमी व अस्थिर भावामुळे मागील दोन वर्षांपासून बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्रीअभावी घरातच पडून आहे. याउलट मान्सूनपूर्व कापूस लागवडीसाठी शेतकरी सरसावला असताना ८६० रुपयांची बियाणे बॅग १२०० किंवा त्याहून चढ्या दराने विकली जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
बियाण्यांची काळ्या बाजारात विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रार करावी. संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल.
- पी. के. बागले, तालुका कृषी अधिकारी, भडगाव.