रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक, आरपीएफची कारवाई

By विजय.सैतवाल | Published: April 24, 2023 04:56 PM2023-04-24T16:56:38+5:302023-04-24T16:57:00+5:30

१७ हजार रुपयांची नऊ तिकीटं जप्त.

Black marketer of railway worth rs 17000 tickets arrested RPF action | रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक, आरपीएफची कारवाई

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक, आरपीएफची कारवाई

googlenewsNext

जळगाव : ई-आरक्षण रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या नरेंद्र सुधाकर घोलप (३४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जिल्हापेठ, जळगाव) याच्याविरुद्ध रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण १७ हजार ३६७ रुपयांचे नऊ तिकीट जप्त केले. रविवार, २३ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.

रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक मनोज सोनी, मुख्य आरक्षण अधिकारी सुनील मराठे, विनोद जेठवे यांना जिल्हा पेठेतील प्लॉट नंबर १०१, लक्ष्मी निवास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटनजीकच्या घरात संशयास्पद युझर आयडीवरून तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पथकाने तपासणी केली असता तेथे उपस्थित व्यक्तीने नरेंद्र सुधाकर घोलप असे नाव सांगितले.

संशयास्पद युझर आयडीबद्दल विचारणा केली असता गेल्या दीड वर्षापासून तो स्वत:च्या मोबाइल क्रमांकाचा वापर करीत रेल्वेचे ऑनलाइन आरक्षित तिकिटांचे लॅपटॉपवरून बुकिंग करीत आहे. ज्या प्रवाशांना तिकिटांची आवश्यकता आहे, अशा प्रवाशांना तो तिकिटाच्या रकमेपेक्षा ५० ते १०० रुपये अधिक घेऊन तिकीट विक्री करीत होता. पथकाने सदर व्यक्तीला लॅपटॉपसह ताब्यात घेत आरपीएफ पोलिस ठाण्यात आणले.

घोलप याने तयार केलेल्या युझर आयडी व पासवर्डला कार्यालयीन संगणकावरून आयआरसीटीसीच्या वेबसाइडवर तपासणी केली असताना चार हजार ९२९.६० रुपये किमतीचे चार ‘लाइव्ह रेल्वे तिकीट’ व १२ हजार ४३८.३५ रुपयांचे पाच ‘फास्ट रेल्वे तिकीट’ असे एकूण १७ हजार ३६७.९५ रुपयांचे नऊ रेल्वे तिकीट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी लॅपटॉप जप्त करीत नरेंद्र सुधाकर घोलपविरुद्ध रेल्वे अधिनियमनानुसार कलम १७९ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Black marketer of railway worth rs 17000 tickets arrested RPF action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे