लोहार, न्यायाधीशांना म्हणाले... तुमचे शिक्षण कुठे झाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 03:58 AM2019-01-20T03:58:28+5:302019-01-20T03:58:38+5:30
न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी जिल्हा न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांना तुमचे शिक्षण कुठे झाले आहे, अशी विचारणा केली. त्यावर न्या. लाडेकर यांनी अमरावती येथून कायद्याची पदवी घेतल्याचे सांगितले.
जळगाव : न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी जिल्हा न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांना तुमचे शिक्षण कुठे झाले आहे, अशी विचारणा केली. त्यावर न्या. लाडेकर यांनी अमरावती येथून कायद्याची पदवी घेतल्याचे सांगितले.
लोहार यांनी मीदेखील मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्या. लाडेकर यांनी, तुम्ही असे का विचारले? अशी विचारणा केली. त्यावर अमरावती येथे वेगळे काही शिकायला मिळाले का? हे जाणून घ्यायचे होते, म्हणून विचारल्याचे लोहार यांनी सांगितले. न्या. लाडेकर यांच्या चेहऱ्यावर थोडेस हास्य दिसताच, लोहार यांनीही स्मित हास्य केले. लोहार हे काही काळ तुरुंगातही होते. त्यानंतर, त्यांना जामीन मिळाला होता.
>लोहार ११९ तर येवले २३५ दिवस अटकेत
>मनोज लोहार यांना २४ जून, २०१२ रोजी अटक करण्यात आली होती. ते ११९ दिवस कारागृहात होते. धीरज येवले याला १३ मार्च २०१२ रोजी अटक झाली होती. तो २३५ दिवस कारागृहात होता.
>असे कलम, अशी शिक्षा
>६४ (अ) : जन्मठेप, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ५ महिने साधी कैद
>३४८ :
२ वर्ष कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास महिना कैद
>३४२, ३४६, ३८५ :
१ वर्ष कारावास, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद
>५०४ :
१ वर्ष कारावास, ५०० दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद
>५०४ या कलमातून येवले यास तर ५०६ कलमातून लोहार यांना वगळण्यात आले आहे.