कारागृहात कैद्यावर ब्लेडने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:34 AM2019-02-03T11:34:42+5:302019-02-03T11:35:54+5:30

भेटीवरुन वाद

Blade attacked with prisoner in jail | कारागृहात कैद्यावर ब्लेडने हल्ला

कारागृहात कैद्यावर ब्लेडने हल्ला

Next
ठळक मुद्देदोन कैद्यांच्या पत्नीतही हाणामारी



जळगाव : परिवारातील सदस्यांच्या भेटीवरुन कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी होऊन एका कैद्याने दुसऱ्याच्या छातीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी साडे तीन वाजता घडली. इसा शेख हमीद (रा.तांबापुरा, जळगाव) असे जखमीचे नाव आहे. कारागृह प्रशासनाने मात्र हल्ल्याचा इन्कार केला आहे.
गोळीबाराच्या प्रकरणात सतीश गायकवाड हा गेल्या तीन ते चार वर्षापासून कारागृहात आहे तर इसा शेख हा देखील हाणामारीच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. शनिवारी दोघांच्या पत्नी व नातेवाईक त्यांना भेटायला आले होते.
सतीश गायकवाड हा इंटरकॉम सेवेच्या दूरध्वनीवरुन पत्नीशी बोलत असताना, तेथेच इसा याचीही पत्नी होती. तेथे दोघं कैद्यांच्या पत्नीत वाद झाला.
त्यानंतर इसा व गायकवाड यांच्यात खिडकीजवळच वाद झाला. यात गायकवाड याने इसा याच्यावर ब्लेडने हल्ला केला. त्यात पोटाजवळ रक्तस्त्राव झाल्याचा दावा इसाची पत्नी दीपाली व भाऊ अल्ताफ याने केला.
बाहेरुन आणली औषधी
इसा याच्यावर हल्ला झाल्यानंतर उपचारासाठी कारागृहात औषधी नव्हती, त्यामुळे आपण बाहेरुन औषधी आणून दिल्याची माहिती इसाचा भाऊ अल्ताफ याने पत्रकारांना दिली. यात तो नेमका किती जखमी झाला आहे, ते सांगितले जात नाही तसेच कुटुंबाला भेटू दिले जात नसल्याचे अल्ताफ याने सांगितले. बाहेर गायकवाड याच्या पत्नीनेही मारहाण केली व तुझ्या नवºयाला माझा नवरा कारागृहात इंगा दाखवेल अशीही धमकी दिल्याचा आरोप दीपाला हमीद यांनी केला.
गायकवाड याने यापूर्वीही घातला होता वाद
गायकवाड याने यापूर्वीही कारागृहात वाद घातला होता, त्यामुळे त्याला तत्कालिन प्रभारी अधीक्षक सुनील कुवर यांनी नाशिकला पाठविले होते. आता तो पुन्हा परत आला. त्याशिवाय कारागृहाचे तत्कालिन अधीक्षक डी.टी.डाबेराव व एका कर्मचाºयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सापळाही लावला होता. हा सापळा यशस्वी झाला होता.
दोन कैद्यांच्या पत्नीचा बाहेर वाद झाला. कारागृहात दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. ब्लेडने हल्ला केल्याची अफवा आहे. तशी कोणतीच घटना घडली नाही. आधीच कारागृहात क्षमतेपक्षा दुपटीने कैदी आहेत. -अनिल वांढेकर, प्रभारी अधीक्षक, कारागृह
कारागृहात भाऊ इसा याच्यावर सतीश गायकवाड याने ब्लेडने हल्ला केला. त्याच्यावर उपचारासाठी मी स्वत:च बाहेरुन औषधी आणून दिली. त्यानंतर कारागृहाचे अधिकारी व कर्मचारी भावाला भेटू देत नाही. पत्रकारांना माहिती सांगू नका, नाही तर तुमची भेट होवू देणार नाही असेही धमकावले जात आहे. -अल्ताफ शेख हमीद, जखमीचा भाऊ

Web Title: Blade attacked with prisoner in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.