अंध सहाय्यता दिन : अंधत्व निवारणात जळगाव जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:05 PM2019-10-15T12:05:06+5:302019-10-15T12:06:18+5:30

मोतीबिंदू निवारणात सहा महिन्यातच ५० टक्के उद्दीष्ट पूर्ण

Blind Assistance Day: Jalgaon district tops in blindness prevention | अंध सहाय्यता दिन : अंधत्व निवारणात जळगाव जिल्हा अव्वल

अंध सहाय्यता दिन : अंधत्व निवारणात जळगाव जिल्हा अव्वल

googlenewsNext

जळगाव : मोतीबिंदू अथवा डोळ््यातील पडदा, बुबूळ यांच्या विविध व्याधींमुळे येणारे अंधत्व रोखून रुग्णांना नवदृष्टी देण्यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम ठरला असून विविध दृष्टीदोष दूर करण्यासाठीचे प्रमाणही तीन वर्षांच्या तुलनेत वाढल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.
अंधत्वासाठी मुख्य कारण ठरत असलेली मोतीबिंदूची लागण पूर्वी वयाच्या चाळीशीनंतर होत असे. मात्र आता अनेकांना चाळीशीच्या आतच मोतीबिंदू होऊ लागल्याने अंधत्वाचे प्रमाणही वाढत आहे. त्यात आता भर म्हणजे मोबाईल, संगणक यांच्या वाढत्या वापरामुळे दृष्टीदोषाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहे. यात राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्याला अंधत्व निवारणाचे उद्दीष्ट दिले जात आहे. या उद्दीष्ट पूर्तीमध्ये जळगाव जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे. पूर्वी जळगाव जिल्ह्यात १५ ते २० टक्के उद्दीष्टपूर्वी होत असे. मात्र तीन वर्षांमध्ये वाढत्या जनजागृती व शासकीय रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सुविधांमुळे हे उद्दीष्ट पूर्ण होऊ लागले आहे. त्याचमुळे जळगाव जिल्ह्यातील कार्य पाहता यंदा जळगाव जिल्हा अव्वल ठरला आहे.
१३ हजार ५०० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया
मोतीबिंदू निवारणासाठी यंदा जळगाव जिल्ह्याला २८ हजार १९४ रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात एप्रिल महिन्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत १३ हजार ५०० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांना नवदृष्टी देण्यात आली. या सोबतच बुबूळ रोपणाचेही ( किरॅटो प्लास्टी सर्जरी) काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
५१० विद्यार्थ्यांना चष्म्याचा लाभ
सध्या मुलांमध्येही नेत्रविकाराचे प्रमाण वाढत असल्याने त्यांचा दृष्टीदोष करण्यासाठीही प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट दिले जात आहे. यात यंदा शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ७० हजार मुलांच्या नेत्रतपासणीचे उद्दीष्ट जिल्ह्याला देण्यात आले. त्यात आतापर्यंत २७ हजार विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी ५१० विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना चष्मे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शासकीय रुग्णालयांवर वाढता विश्वास
जिल्हा रुग्णालयात असलेल्या अद्यायावत नेत्र शस्त्रक्रियागृहामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे सांगत त्यामुळेच उद्दीष्टपूर्ती शक्य होत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील अंधत्व निवारणाचे हे काम पाहता जामनेर उपजिल्हा रुग्णालयासाठीही नेत्र शस्त्रक्रियागृह मंजूर करीत त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे.
अंधत्व निवारणासाठी वाढत्या जनजागृतीसोबतच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येणाºया सुविधांमुळे अंधत्वाचे प्रमाण कमी होत आहे. यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमातंर्गत यंदा देण्यात आलेल्या उद्दीष्टापैकी आतापर्यंत ५० टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: Blind Assistance Day: Jalgaon district tops in blindness prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव