अमळनेरातील अंध विद्यार्थ्याने मागितली राज्यपालांकडे इच्छा मरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:06 PM2019-03-26T23:06:00+5:302019-03-26T23:07:30+5:30

सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने तपासला अर्ज

A blind student asked for the permission of the governor to die | अमळनेरातील अंध विद्यार्थ्याने मागितली राज्यपालांकडे इच्छा मरणाची परवानगी

अमळनेरातील अंध विद्यार्थ्याने मागितली राज्यपालांकडे इच्छा मरणाची परवानगी

Next

अमळनेर : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतली जाणारी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने येथील विराज पार्क भागातील पीएच़डी करणाऱ्या जितेंद्र शालीक पाटील या अंध विद्यार्थ्यांने राज्यपालांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे एम.ए.च्या परीक्षेत ग्रेस मिळाले असताना सेट परीक्षेपूर्वी आयोगाने अर्ज न तपासल्याने जितेंद्र यांची पायपीट होत आहे.
जितेंद्र पाटील हे ‘अंध आणि अपंगांची सद्य स्थिती’ या विषयावर पीएच़डी करीत आहेत. सोबत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेतली जाणारी सेट परीक्षादेखील दिली. त्यात ते उत्तीर्ण झाले. मात्र एम.ए.च्या परीक्षेत तीन गुणांची ग्रेस मिळाली असल्याने सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही. ग्रेस मिळालेल्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षा देता येत नाही. जितेंद्र पाटील हे अंध विद्यार्थी गेल्या दहा वर्षांपासून ही परीक्षा देत होता. त्यावेळी आयोगाने परीक्षेचा अर्जदेखील तपासला नाही. मात्र जेव्हा ते सेट उत्तीर्ण झाले त्या वेळी आयोग जागे झाले आणि प्रमाणपत्र आवश्यक असल्यास ‘क्लास इंप्र’ करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यासाठी त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूंची भेट घेतली. तुम्ही राज्यपालांकडे अर्ज करा असा सल्ला कुलगुरूंनी दिल्याचे जितेंद्र पाटील यांचे म्हणणे आहे.

विद्यापीठाने सहानुभूतीपूर्वक विचार करून ग्रेस न देता उत्तीर्ण केले असते व सेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळाले असते. त्यातून प्राध्यापकाची नोकरीदेखील मिळाली असती
- जितेंद्र पाटील, तक्रारदार

क्लास इंप्रू हा केवळ पाच वर्षाच्या आत करता येतो. मात्र जितेंद्र पाटील यांना ९ वर्षे झाल्याने त्यांना परवानगी देता येणार नाही.
- प्रा. बी.पी. पाटील, परीक्षा प्रमुख, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ.

Web Title: A blind student asked for the permission of the governor to die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव