मराठा समाजातर्फे चाळीसगावला रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 03:44 PM2023-11-01T15:44:22+5:302023-11-01T15:45:59+5:30
मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
संजय सोनार
चाळीसगाव (जि. जळगाव) : मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी चाळीसगाव येथील सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी सकाळी खडकी बायपास येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती.
मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, गणेश पवार, तमाल देशमुख, प्रा. चंद्रकांत ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.