प्रत्येक चौकात नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:53 AM2020-07-07T11:53:19+5:302020-07-07T11:53:35+5:30

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून शहर आठवडाभरासाठी लॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात ...

Blockade at every intersection | प्रत्येक चौकात नाकाबंदी

प्रत्येक चौकात नाकाबंदी

Next

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून शहर आठवडाभरासाठी लॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात अत्यावश्यक व रुग्णव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मिळणार नाही, किंवा कोणालाही शहरात विनाकारण वावरता येणार आहे.
यावेळेसचे लॉकडाऊन अतिशय कडक असणार आहे, त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अतिरिक्त नाकाबंदी व फिक्स पॉर्इंट लावण्यात आले असून सहा महिला आरसीपी प्लाटून व ८० पुरुष कर्मचारी अतिरिक्त देण्यात आले आहेत.
एस.पींनी घेतली बैठक
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोमवारी दुपारी शहरातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आठ दिवस बंदोबस्त कसा राहिल, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी, रजा कोणालाही देवू नये याबाबत सूचना केल्या. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन उपस्थित होते.

असा आहे पोलीस ठाणे निहाय वाढीव बंदोबस्त
रामानंद नगर : २०
एमआयडीसी : १९
जळगाव तालुका : ८
शनी पेठ : १०
जिल्हा पेठ : ९
जळगाव शहर : १४
येथून अतिरिक्त बंदोबस्त
मुख्यालय : २५
सायबर पोलीस ठाणे : ९
एलसीबी : २४
शहर वाहतूक शाखा : १३
आर्थिक गुन्हे शाखा : ९

Web Title: Blockade at every intersection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.