वाळू माफीयांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:55+5:302021-05-28T04:13:55+5:30
अमळनेर/ नांदेड : तापी व पांझरा नदीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...
अमळनेर/ नांदेड : तापी व पांझरा नदीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमळनेर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडण्यात आले तर नांदेड येथे तापी नदी किनारी रस्ताच खोदण्यात आल्याने वाळू माफियांची नाकाबंदी करण्यात आली आहे.
तापी व पांझरा नदीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर ला महसूल पथकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पांझरा नदीतून अवैध वाळू वाहतूक सुरू असून, त्या भागातील महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. प्रांताधिकारीच्या आदेशाने तहसीलदार मिलिंद वाघ , तलाठी गौरव शिरसाठ , मनोहर भावसार , विकास परदेशी , पराग पाटील , प्रकाश महाजन , निलेश पवार , सचिन बमनाथ , गणेश महाजन , वाय आर पाटील , आशिष पारध्ये यांनी तांदळी गावाला पांझरा नदीत सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारे राज अली , विशाल जाधव आणि देशमुख जैतपीरकर या तिघांचे ट्रॅक्टर रंगेहात पकडले. त्यावेळी अवैध वाळू वाहतूक करणारे व काही गावकरी यांच्यात वाददेखील झाले; मात्र घाटनास्थळी मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय राहुल फुला, पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर वेळीच पोहचल्याने वाद मिटला तसेच याच पथकाने मठगव्हाण येथील तापी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे भूषण राजेंद्र देवरे याचे ट्रॅक्टर पाठलाग करून पकडले ट्रॅक्टर तहसील आवारात जमा करण्यात आले आहे.