अखंड भारत स्मृतीदिनानिमित्त १८२ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 07:50 PM2020-08-14T19:50:00+5:302020-08-14T19:53:21+5:30
अंबिका व्यायाम शाळेतर्फे अखंड भारत स्मृतीदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १७३ पुरूष व ९ महिला अशा १८२ दात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या महामारीतही आपली ज्वाज्वल राष्ट्रभक्ती समर्पित केली.
रावेर, जि.जळगाव : शहरातील अंबिका व्यायाम शाळेतर्फे अखंड भारत स्मृतीदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १७३ पुरूष व ९ महिला अशा १८२ दात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या महामारीतही आपली ज्वाज्वल राष्ट्रभक्ती समर्पित केली. या शिबिराला १५ वर्षांची परंपरा लाभली असून सोळाव्या वर्षात यंदा पदार्पण केले आहे.
शहरातील अंबिका व्यायामशाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटक लखमसी पटेल, कांतीलाल महाराज, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन व बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रवीण चौधरी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
डॉ.माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर झाले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, जि.प.चे माजी सभापती सुरेश धनके, नगराध्यक्ष दारा मोहंमद, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, देवीचंद छोरिया, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन आदी अतिथींनी शिबिराला भेट दिली. याप्रसंगी अंबिका व्यायामशाळेचे संचालक भास्कर महाजन (पहेलवान) व सहकाऱ्यांनी स्वागत केले.
कर्जोद ग्रा.पं.सदस्या भाग्यश्री पाठक यांनी त्यांचा वाढदिवस व अखंड भारत स्मृतीदिनाचे औचित्य साधून रक्तदान करण्याचा संकल्प सोडला. लताबाई विश्वनाथ महाजन या महिलेने सतत १५ वेळा रक्तदान करून आपली राष्ट्रभक्तीचे समर्पण केले आहे.
या रक्तदान शिबीराचे यशस्वीतेसाठी अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर पहेलवान, रवींद्र महाजन, विकास देशमुख, चंद्रकांत रायपूरकर, भगवान चौधरी, संतोष पाटील, अशोक पाटील, अनिल पाटील, नत्थू महाजन, युवराज माळी, अजय महाजन, सचिन महाजन, अॅड तुषार महाजन, निलेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.