शेंदुर्णी येथे ३४ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:47 PM2019-12-20T22:47:02+5:302019-12-20T22:48:19+5:30
रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या ३५व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ जणांनी रक्तदान केले.
शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आचार्य गजाननराव गरुड यांच्या ३५व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर झाले. त्यात ३४ जणांनी रक्तदान केले.
उद्घाटन तहसीलदार अरुण शेवाळे व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी केले. संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी मान्यवरांचा सत्कार केला. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.दिनेश पाटील यांनी रक्तदान शिबिर घेण्यामागील भूमिका विशद केली. प्राचार्य डॉ.वासुदेव आर पाटील, उपप्राचार्य डॉ.श्याम साळुंखे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी महेश पाटील, प्रा.अप्पा महाजन यांनी स्वत: रक्तदान केले.
याप्रसंगी पो.नि. प्रतापराव इंगळे, सहसचिव सागरमल जैन, संचालक यु.यु. पाटील, प्रा.सुनील गरुड, शांताराम गुजर, दीपक जाधव उपप्राचार्य प्रा.एन.एस.सावळे, प्रा.आर.जी. पाटील, डॉ.संजय भोळे, डॉ.श्याम साळुंखे, डॉ.प्रशांत देशमुख, प्रा.अमर जावळे, प्रा.एस.जी.डेहरकर, प्रा.ए.एस.महाजन, डॉ.सुजाता पाटील, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.योगीता चौधरी, रा.से.यो. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.वसंत पतंगे, प्रा.एन.बी.वानखेडे, प्रा.पी.जे.सोनवणे, प्रा.छाया पाटील, प्रा.रिना पाटील, डॉ.आर.डी.गवारे, डॉ.भूषण काटे, पो.कॉ. अजयसिंग राजपूत, प्रा.दीपक पाटील, प्रा.संदीप कुंभार, रक्तदाते व स्वयंसेवक े उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी अविनाश भारूडे, सचिन कुंभार, सागर तडवी, विनय गरुड, व्यंकटेश उपाध्याय यांनी परिश्रम घेतले.